दहावीची उद्यापासून परीक्षा

कोल्हापूर : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्यावतीने घेण्यात येणारी इयत्ता दहावीची परीक्षा उद्या मंगळवारपासून सुरु होणार आहे.

    या परीक्षेला कोल्हापूर विभागातून एक लाख ३४ हजार विद्यार्थी परीक्षेला बसणार आहे. शाळा तेथे परीक्षा या धोरणानुसार ही परीक्षा दोन हजार केंद्रावर घेण्यात येणार आहे. प्रत्येक वर्गात २५ विद्यार्थी परीक्षा देणार आहेत.  सर्व परिक्षार्थीनी एक तास अगोदर परीक्षा केंद्रावर उपस्थित राहण्याचे आवाहन मंडळांने केले आहे.

 दहावीच्या परीक्षेसाठी केंद्रावर अन्य शाळांमधील पर्यवेक्षक राहणार आहेत तसेच तहसीलदारांच्या अध्यक्षतेखाली पोलीस,  गट विकास अधिकारी,  गटशिक्षणाधिकारी यांची समिती नेमण्यात आली आहे. तसेच प्रत्येक शाळेत कॉपीमुक्त परीक्षेसाठी भरारी पथक तैनात असणार आहे.