जयश्री दिवे कर्तृत्ववान महिला पुरस्काराने सन्मानित

कोल्हापूर (प्रतिनिधी) :‘राज्यस्तरीय कर्तृत्ववान महिला’ पुरस्काराने जिल्हा परिषदेच्या ग्रामसेविका जयश्री दिवे यांना सन्मानित करण्यात आले आहे. अनंतशांती बहुउद्देशीय सामाजिक सेवा संस्थेच्या वतीने जयश्री दिवे यांना हा पुस्कार प्रदान करण्यात आला.येथील महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या कार्यालयात या पुरस्काराचे वितरण करण्यात आले.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राजर्षि शाहु गव्हर्मेट बँकेचे अध्यक्ष रविद्रं पंदारे होते.

कृषी, शैक्षणिक, सामाजिक, आरोग्य, महसूल, ग्रामविकास, क्रीडा या श्रेञात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांना यावेळी गौरवण्यात आले.


यावेळी शितल जाधव (कृषी सहाय्यिका), सिध्धवी माने (उत्कृष्ट खेळाडू), सौ.सुवर्णा लोखंडे, अनिता पोवार (परिसेविका), प्रिया काळे (समाज कल्याण निरीक्षक), दिपिका तिबिले, रसिका कोडोलीकर (अव्वल कारकुन, जिल्हाधिकारी कार्यालय), रंजना पौंडकर (आशा स्वयंसेविका), लता काबंळे (तालुका कृषि अधिकारी, करवीर), मयुरी पाटील (पाटबंधारे विभाग), स्नेहा मांगुरे (पञकार), आदिती सरावणे (आदर्श शिक्षिका), ॲड.संगिता तांबे (समाज सेविका), शिल्पा खोत (ट्राफिक पोलिस) यांच्यासह काजल साळोखे, रुपाली सांवत यांचा गौरव करण्यात आला.


यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना राजर्षि शाहु गव्हर्मेट बँकेचे उपाध्यक्ष अतुल जाधव म्हणाले, स्ञी पुरुष समानता ही काळाची गरज आहे. यावेळी प्राचार्य स्मिता गिरी याचे व्याख्यान झाले. संचालक एम.एस.पाटील, रोहित बांदिवडेकर, विलासराव कुरणे, सौ.हेमा पाटिल, डाँ.अश्विनी खोराटे, अश्विनी ढमाल, मनोज माने, प्रमोद पाटील आदी उपस्थित होते.

कार्यक्रमाचे संयोजन अनंतशांती संस्थेचे संस्थापक भगवान गुरव, अध्यक्षा माधुरी खोत, सचिव अरुणा पाटील यांनी केले. सुंञसंचालन सौ.अरुणा पाटील यांनी केले. संस्थेच्या कार्याचा आढावा सौ.प्रार्थना शेलार यांनी घेतला. आभार संजय खोत यांनी मानले.