कोल्हापूर : छत्रपती शिवाजी महाराज यांचा चुकीचा इतिहास सांगून सावित्रीबाई फुले व महात्मा फुले यांच्याबद्दल अनुद्गार काढल्याच्या निषेधार्थ राज्यपाल आणि शिवाजी विद्यापीठाचे कुलपती भगतसिंह कोश्यारी यांचा निषेध करत सिनेट सदस्यांनी मुख्य प्रशासकीय इमारतीसमोर घोषणाबाजी करीत निदर्शने करण्यात आली.
शिवाजी विद्यापीठाच्या सभागृहात अधिसभा सुरु होण्यापूर्वी विकास आघाडीच्या सिनेट सदस्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोर एकत्र येत राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या निषेधार्थ निदर्शने केली. भगतसिंह कोश्यारी यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. तर अधिसभेत कुलगुरूंनी वार्षिक अहवाल सादर करताच डॉ. प्रताप पाटील यांनी राज्यपाल यांच्या विरोधात निषेधाचा स्थगण प्रस्ताव सादर केला. छ. शिवाजी महाराज यांच्याबद्दल चुकीचा इतिहास सांगणाऱ्या आणि सावित्रीबाई फुले यांच्याबद्दल चुकीचे उदगार काढल्याबद्दल निषेधाचा सादर केलेला स्थगन प्रस्ताव अमान्य करताच डॉ. प्रताप पाटील, मधुकर पाटील, डॉ. बी आर मोरे, डी यु पोवार. डॉ. आर एस अडसूळ, प्रताप पाटील, भैय्या माने, धैर्यशील पाटील, मेघा गोळवणे, डॉ. भारती पाटील या सदस्यांनी सभात्याग केला.