कोल्हापूर : शहराच्या मध्यवस्तीतील बिंदू चौकाच्या दर्शनी भागात एका चित्रपटाच्या जाहिरातीची अश्लील पोस्टर्स लावली होती. याबाबत महिलांकडून तक्रारी येत असल्याने युवासैनिकांनी आक्रमक होत ही पोस्टर्स फाडून टाकली.
याबाबत अधिक माहिती अशी, बिंदू चौक हा शहरातील मध्यवरती वस्तीत आहे. इथून हजारो पर्यटक आई अंबाबाई मंदिराकडे येत असतात. अश्या ठिकाणी बिकनी घातलेल्या एका युवतीची जाहिरात असणारी पोस्टर्स लावली होती. या अशोभनिय प्रकाराबाबत युवासेनेकडे तक्रारी येत होत्या. याबाबत संतप्त होत निषेध व्यक्त करुन युवासेनेच्या पदाधिकाऱ्यांनी फाडून टाकली.
यावेळी युवासेना कोल्हापूर जिल्हा प्रमुख मंजित किरण माने, युवासेना उप शहर प्रमुख वैभव जाधव, शेखर बारटक्के, तालुका प्रमुख फिरोज मुल्लानी, विभाग प्रमुख चैत्यन्य देशपांडे, उपतालुका प्रमुख सतीश कारंडे, तसेच रविकिरण गवळी आदी उपस्थित होते.