इचलकरंजी : येथील लायन्स क्लब ऑफ इचलकरंजी व विद्योदय मुक्तांगण परिवार यांच्यावतीने छोटे कलाम अवार्ड उपकरण स्पर्धेत जंबुकुमार देवाप्पा हुल्ले प्राथमिक विद्यामंदिर रुई यांनी प्रथम क्रमांक मिळविला. या प्रकल्प स्पर्धेत एकूण १६ प्रकल्पांचे सादरीकरण करण्यात आले होते.
दुसरा क्रमांक – व्यकंटराव हायस्कुल (इचलकरंजी), तृतीय क्रमांक – (इचलकरंजी) हायस्कुल इचलकरंजी, तर चतुर्थी क्रमांक – बाहुबली विद्यापीठ संचलित इंग्लिश मिडीयम स्कुलने (अब्दुललाट) मिळविला.
यावेळी डॉ. शशिकांत कुंभार यांनी विज्ञान म्हणजे काय? आणि विज्ञानाची व्याप्ती यासंबंधात माहिती दिली. क्लब प्रशासक विजय राठी, अध्यक्ष लक्ष्मीकांत भट्टड, खजिनदार महेंद्र बालर, सचिव शैलेंद्र जैन उपस्थित होते. मॉडेल्स सादरीकरण विनायक माळी व राजेंद्र चौगुले यांनी केले. परीक्षण सुनील स्वामी व अब्दुल करीम जमादार, डॉ. शशिकांत कुंभारयांनी केले. बक्षीस वितरण अध्यक्ष लक्ष्मीकांत भट्टड, खजिनदार महेंद्र बालर, कनक भट्टड यांच्या हस्ते करण्यात आले. प्रास्ताविक विनायक माळी तर सार्शा माळी आभार मानले. सूत्रसंचालन राजेंद्र चौगुले यांनी केले.