आजचं राशीभविष्य मंगळवार,८ मार्च २०२२

आजचं राशीभविष्य मंगळवार, ८ मार्च २०२२ : आजच्या दिवशी तुमच्या राशी नुसार तुमच्यासाठी कोणकोणत्या चांगल्या गोष्टी येऊ घातल्या आहेत त्यांचे स्वागत करण्यास तयार व्हा आणि ज्या फारशा चांगल्या नाहीत, त्यांचाही स्वीकार करा. आज तुमच्यासाठी काय वाढून ठेवले आहे, ते पाहूया..

मेष:-

कामाची लगबग राहील. काही अनपेक्षित बदल जाणवतील. लहान मुलांच्यात रमून जाल. वरिष्ठांच्या मर्जीचे पालन करावे. हातातील कामात यश येईल.

वृषभ:-

प्रवासात काहीसा त्रास संभवतो. खर्चाचे प्रमाण वाढू शकते. काही कामात अडकून पडल्यासारखे वाटू शकते. मनातील इच्छेला पूर्णत्व येऊ शकते. जिथे जाल तिथे आनंद वाटाल.

मिथुन:-

औद्योगिक वातावरण चांगले राहील. काही गोष्टी अनपेक्षितपणे लाभतील. आवडते खाद्यपदार्थ चाखायला मिळतील. तुमची समाजप्रियता वाढेल. आपल्या वागण्याने इतरांची मने जिंकून घ्याल.

कर्क:-

वैवाहिक सौख्याकडे लक्ष ठेवावे. चिकाटी सोडून चालणार नाही. क्षुल्लक गोष्टींकडे दुर्लक्ष करावे. जुनी कामे नव्याने सामोरी येतील. बाहेरील अन्नपदार्थ खाणे टाळावे.

सिंह:-

व्यावहारिक दृष्टिकोन ठेवावा. मनातील संकोच दूर सारावा. जवळच्या व्यक्तीजवळ मोकळे करावे. कामातून समाधान शोधाल. हाताखालील लोकांचे सहकार्य मिळेल.

कन्या:-

जोडीदाराच्या मताचा आदर कराल. काही गोष्टी जाणीवपूर्वक कराव्या लागतील. घरातील समस्या जाणून घ्याव्यात. अचानक धनलाभ संभवतो. स्थावरची कामे मार्गी लागतील.

तूळ:-

कामाला योग्य दिशा मिळेल. उत्कृष्ट साहित्य वाचनात येईल. घरातील कामात अधिक लक्ष घालावे लागेल. तुमच्या अधिकारात वाढ होईल. कामे वेळेत पूर्ण करता येतील.

वृश्चिक:-

आर्थिक व्यवहारात सावधानता बाळगावी लागेल. फसवणुकीपासून सावध राहावे. मत्सराला बळी पडू नका. आवक-जावक यांचे योग्य गणित मांडावे. गरज पाहून खर्च करावा.

धनू:-

शांत व संयमी विचारांची जोड घ्यावी. उतावीळपणा करून चालणार नाही. आपले कष्ट सार्थकी लावण्याचा प्रयत्न करावा. क्षुल्लक गोष्टींना फार महत्व देवू नका. डोकेदुखीचा त्रास जाणवेल.

मकर:-

मानसिक चंचलता जाणवेल. दिवस आपल्या मर्जीप्रमाणे घालवावा. जुन्या गोष्टी उगाळत बसू नका. जबाबदारी योग्य प्रकारे पार पाडाल. काही कामे तुमचा कस पाहतील.

कुंभ:-

श्रमामुळे थकवा जाणवेल. मैत्रीचे संबंध जपावेत. पैशाचे गणित तपासून पहावे लागेल. कामात चंचलता आड आणू नका. नवीन लोकांच्यात मिसळावे.

मीन:-

गोष्टी तुमच्या मनाप्रमाणे घडून येतील. झोपेची तक्रार दूर करावी. तुमच्या कामाची योग्य दखल घेतली जाईल. हातातील कामात यश येईल. चांगला व्यावसायिक लाभ संभवतो.