कोल्हापूर : कोल्हापूर शहरासह जिल्ह्यात उन्हाचा तडाखा वाढू लागला आहे. दुपारच्यावेळी मे महिन्याप्रमाणे उन्हाची रणरण जाणवत आहे. उन्हापासून बचावासाठी नागरिक टोप्या, गॉगल तसेच स्कार्फचा वापर करू लागले आहेत.
थंडी संपल्यानंतर फाल्गुन महिन्यात उन्हाचा जोर वाढू लागतो यंदाही उन्हाचा जोर वाढू लागला आहे. दुपारी बारानंतर उन्हाचा तडाखा सुरू होतो तो सायंकाळी पाच वाजेपर्यंत जाणवत आहे.
उन्हाचा तडाखा वाढत असलयामुळे शहरात शीतपेयांचे स्टॉल चौकाचौकात दिसू लागले आहेत. ताक लस्सी तसेच उसाचा रस व कलिंगडाचा रस यांचे स्टॉल शहरातील मध्यवर्ती चौकात तसेच गल्लीबोळातील दिसत आहेत. तसेच फोल्डिंग हाऊसमध्ये देखील शीतपेये पिण्यासाठी हळूहळू गर्दी वाढत आहे. फळांच्या स्टॉलवर कलिंगड, द्राक्षे यांची आवक मोठ्या प्रमाणावर होत आहे. तहान शमवण्यासाठी कलिंगडाच्या स्टॉलवर गर्दी वाढत आहे. मोसंबीच्या रसाला ही मागणी आहे. उन्हापासून बचाव करण्यासाठी टोप्या तसेच स्कार्फचा वापर वाढू लागला आहे.