मॉस्को (मॉस्को) : रशियाने युक्रेनबरोबर तात्पुरती युद्धबंदीची घोषणा केली आहे. नागरिकांना बाहेर पडण्यासाठी सुरक्षित कॉरिडॉर उपलब्ध करून देणार असल्याचेही रशियाने जाहीर केले आहे.
रशियाने युध्दाच्या दहाव्या दिवशी तात्पुरता युद्धविराम जाहीर केला आहे. यावेळी नागरिकांना सुरक्षित बाहेर पडण्यासाठी युक्रेनच्या मारियुपोल आणि वोल्नोवाखा शहरांमध्ये मानवतावादी कॉरिडॉर उपलब्ध करून देणार असल्याचंही जाहीर केले आहे. यावेळी रशियाकडून गोळीबार होणार नाही, असेही जाहीर करण्यात असून नागरिकांनी शहर सोडावे, आवाहन रशियाने केले आहे.
युक्रेनवर केलेल्या आक्रमणानंतर एकाच आठवड्यात सुमारे दहा लाख नागरिकांनी युक्रेनबाहेर स्थलांतर केले आहे. अत्यंत मोठ्या संख्येने झालेले या शतकातील हे सर्वांत वेगवान स्थलांतर असल्याचे संयुक्त राष्ट्रांनी म्हटले आहे. यानंतर युद्धाच्या दहाव्या दिवशी रशियाने मोठा निर्णय जाहीर केला आहे. नागरिकांना सुरक्षित कॉरिडॉर देण्यासाठी रशियाने निर्णय घेतल्याचं सांगण्यात येतंय. रशियाच्या सरकारने तात्पुरता शस्त्रसंधीचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार तात्पुरतं युद्ध थांबवण्याचा निर्णय रशियाने घेतला आहे. रशियाने मॉस्कोच्या वेळेनुसार सकाळी 10 वाजल्यापासून युद्धविराम घोषित केलायं. यामुळे नागरिकांना मारियुपोल आणि व्होल्नोवाखा सोडण्याची परवानगी देण्याचीही मागणी झाली आहे.