जीवदान, ‘एकटी’ संस्थेने दिला ‘त्याला’ आधार

कोल्हापूर : राजारामपुरीतील टाकाळा परिसरात विकलांग, मतिमंद व निराधार तरुणाला जीवदान व ‘एकटी’ संस्थेने आधार देत माणुसकीचे दर्शन घडविले.
टाकाळा परिसरात एक तरूण गेली आठ महिने भटकत होता. वाटसरूं व परिसरातील रहिवाशांनी जे देईल, ते अन्न पदार्थ खावून उघड्यावरच फुटपाथवर रहात होता. टाकाळा परिसरातील सौ. सुजाता हट्टीकर फराकटे यांनी जीवदान सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष अरुण खोडवे यांच्याशी संपर्क साधून त्या तरुणाच्या पुनर्वसनाची व औषधोपचाराची व्यवस्था करण्याची विनंती केली. त्यानुसार, आज गुरूवारी दि. सकाळी ११.०० वाजता जीवदानची टीम रूग्णवाहिकेसह घटनास्थळी दाखल झाली. यामध्ये अध्यक्ष, अरुण खोडवे, वसंत लिंगणूरकर व अक्षय बागडी यांच्यासह एकटी या संस्थेचे लोकही दाखल झाले. यावेळी संबंधीत विकलांग तरूणाचे केस कापून, त्याला आंघोळ घालून नवी कपडे परिधान करण्यात आली. त्याला सीपीआर रुग्णालयात दाखल करण्यात आले.

हा तरूण आपले नांव चेतन सांगतो, तसेच आई वैशाली, वडील बंडोपंत व बहिण गायत्री असे सांगतो. त्याला इतर काहीही सांगता येत नाही. पत्ता विचारला असता, जुना बुधगांव रोड, सांगली असे सांगतो.