नेसरी पोलीस स्टेशनला ए प्लस मानांकन

गडहिंग्लज: कोल्हापूर परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक लोहिया यांनी आज नेसरी पोलीस ठाण्याची वार्षिक तपासणी केली या तपासणीमध्ये चांगली प्रगती असल्याने ए प्लस नामांकन या पोलिस स्टेशनला मिळाले त्यामुळे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

त्या पोलिस स्टेशनचे साहाय्यक पोलीस निरीक्षक अविनाश माने व त्यांच्या सहकाऱ्यांनी उत्कृष्ट काम केल्यानेहे मानांकन मिळाले.

यावेळी पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे डिवाइस पी राजीव नवले पोलीस निरीक्षक रवींद्र शेळके आदी उपस्थित होतेविशेष म्हणजे पोलीस स्टेशन स्थापनेपासून हे पहिलेच पद मिळाल्याने समाधान व्यक्त होत आहे.