कोल्हापूर: कोल्हापूर समाजरचनेतील घरेलू कामगार हा अत्यंत महत्त्वाचा घटक आहे घरेलू कामगारांच्या मुलांना ही यापुढे हेच काम करायला लागू नये यासाठी प्रयत्नशील असल्याचा विश्वास ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिला.
वॉशिंग मशीन सह साबण आणि डिटर्जंट पावडर अशा वस्तुंवर उपकर लावून घरेलू कामगारांच्या कल्याणकारी योजना राबविणार असल्याचेही ते म्हणाले. कोल्हापुरातील दसरा चौकात श्री शाहू सांस्कृतिक भवन मध्ये आयोजित घरेलू कामगार मेळाव्यात मंत्री श्री मुश्रीफ प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. आयटक संलग्न कोल्हापूर जिल्हा घरेलू कामगार संघटना व कोल्हापूर जिल्हा शेतमजूर युनियन अशा संयुक्त मेळाव्यात याच्या अध्यक्षस्थानी होते.
भाषणात मंत्री श्री मुश्रीफ म्हणाले, महाराष्ट्रात 11 कोटी लोकसंख्या आहे त्यापैकी 5 कोटी कामगार आहेत 80 टक्के असंघटित कामगार आहेत 20 टक्केच संघटित कामगार आहेत असंघटित कामगारांच्या कल्याणकारी योजनांमधून महाराष्ट्रभर सामाजिक क्रांती होईल असेही ते म्हणाले. घरेलू कामगार करीत असलेले काम ही ???सुखी नाही आहेत याची मला पूर्ण जाणीव आहे…???? दिलगिरी….सकाळपासून सुरू असलेली आंदोलने मोर्चे व कार्यक्रमांमुळे मंत्री श्री मुश्रीफ मेळाव्याला एक तास उशिरा पोचले भाषणाच्या सुरुवातीलाच माता-भगिनींनो झालेल्या उशिराबद्दल मी दिलगिरी व्यक्त करीत आहे. असे विधान केले उपस्थित महिलांनी ही मंत्री श्री मुश्रीफ यांच्या नम्रतेचे टाळ्यांच्या गजरात कौतुक केले.
स्वागत व प्रास्ताविक पर भाषण आप जनरल सेक्रेटरी शाहीर सदाशिव निकम यांनी केंद्र सरकार यंत्रणांचा गैरवापर करीत असल्याबद्दल निषेधाचा ठराव मांडला. उपस्थित महिलांनी टाळ्यांच्या गजरात तो संमत केला. त्याआधी आयटकचे श्री. अध्यक्ष एस बी पाटील, सौ.सुशीला यादव, दिलीप पवार, बाळू पवार, विक्रम कदम, शंकर पाटील, सौ रंजना पवार यांची भाषणे झाली.