उदयनराजे छत्रपतींची संभाजीराजे छत्रपती यांच्या उपोषणावर खोचक टीका

सातारा : राज्यसभेतील राष्ट्रपती नियुक्त खासदार संभाजीराजे छत्रपती उद्या ता. 26 फेब्रुवारी पासून मराठा आरक्षण तसेच मराठा समाजाच्या इतर मागण्यांसाठी मुंबईतील आझाद मैदानावर उपोषणाला बसणार आहेत यापार्श्‍वभूमीवर राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया उमटल्या आहेत.भाजपचे राज्यसभेचे खासदार छत्रपती उदयनराजे यांनी संभाजीराजे यांच्या उपोषणावर खोचक शब्दात टीका केली आहे.

मराठा आरक्षणासह सगळ्याच विषयात राजकारण आणणार असाल तर बोलून बोलून तोंडाची चव गेली, असा टोला त्यांनी संभाजीराजे यांचे नाव न घेता लगावला आहे. खासदार संभाजीराजे भोसले मुंबईतील आझाद मैदानावर बेमुदत उपोषणास बसणार आहेत. एकूण 10 प्रमुख मागण्यांकडे लक्ष वेधले आहे. राज्यातील मराठा समन्वयकांनीही सहभागी होण्याचा निर्णय मराठा क्रांती मोर्चाच्या बैठकीत घेण्यात आला आहे. मात्र उदयनराजे भोसले यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना या आंदोलनावर नाराजी जाहीर केली आहे.