कोल्हापूर : इंटरनेट जगतामध्ये मोबाईल ,लॅपटॉप ,यंत्रसामग्री ,या यांत्रिक युगात सांघिक खेळ, मैदानी खेळ याचा तरूणाईला जणु विसरच पडला आहे,,,, पण कोल्हापुरातील कुस्ती खेळाला संजीवनी देण्यासाठी तुळशी सहकार समूह शिरोलीच्या वतीने भव्यदिव्य राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेचे आयोजन करण्यात आल्याचे माजी उपसरपंच सरदार पाटील यांनी सांगितले.
या कुस्ती स्पर्धेसाठी पंचक्रोशीतील पैलवानांनी सकाळपासूनच हजेरी लावायला सुरुवात केली आहे . पैलवानांचा प्रतिसाद पाहून संयोजक समाधानी असलेच सरदार पाटील व पैलवान नितीन पाटील यांनी सांगितले.पालक वर्ग मोठ्या संख्येने आपल्या पाल्याला ्वजन करण्यासाठी येताना चे दृष्य पाहायला मिळत आहे.तसेच सोबत सकाळची खर्डा ,भाकर खाताना चे चित्र इथे पाहायला मिळत आहे.आज सायंकाळी 4वा जि प अध्यक्ष राहुल पाटील यांचे हस्ते स्पर्धेला सुरुवात होणार आहे..