आठ तासांच्या चौकशीनंतर नवाब मलिक यांना ईडीकडून अटक

मुंबई – राज्य सरकारमधील अल्पसंख्याकमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांना ईडीने चौकशीसाठी कार्यालयात नेले होते. तिथे सकाळपासून त्यांची चौकशी सुरू होती. आठ तासांच्या चौकशीनंतर मलिक यांना ईडीकडून अटक करण्यात आली आहे.

पहाटे पाच वाजता ईडीने नवाब मलिक यांच्यावर कारवाई केल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. ईडीने चौकशीअंती नवाब मलिक यांना अटक केली आहे. वैद्यकीय तपासणीसाठी त्यांना जे जे रुग्णालयात नेण्यात येत आहे.

या कारवाईमुळे ईडी कार्यालयाबाहेर तणाव वाढला आहे असून राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. राजकीय सूडबुद्धीने कारवाई केली जात असल्याचा आरोप महाविकास आघाडी सरकार मधील नेते करत आहेत.