बहिरेश्वर येथील वीरबॅक कंपनीच्या वाॅटर ए टी एम चा लोकार्पण सोहळा संपन्न….


बहिरेश्वर : बहिरेश्वर तालुका करवीर येथील ग्रामपंचायत संकलित व विरबॅक औषध निर्माण कंपनीच्या सहयोगातून बहिरेश्वर येथे वॉटर एटीएम मशीन चे उद्घाटन व लोकार्पण सोहळा गोकुळचे चेअरमन विश्वासराव नारायण पाटील, जिल्हा परिषद सदस्य सुभाष सातपुते विरशैव बँकेचे माजी चेअरमन नंदू भाऊ पाटील, सरपंच युवराज दिंडे कुभी कासारी कारखान्याचे माजी संचालक सिताराम पाटील,माजी उपसरपंच सुर्यकांत दिंडे यांचे उपस्थितीत नुकताच पार पडला..

सामाजिक बांधिलकी जपण्यासाठी अॅनिमल औषध निर्माण कंपनी वीरबॅक च्या माध्यमातून लोकांचे आरोग्य जपण्यासाठी कंपनीच्या वतीने गावांसाठी वाॅटर ए टी एम मशीन दिलं असल्याचं रोहित एवले यांनी सांगितले.यासाठी ग्रामपंचायत प्रशासन तसेच डॉ.सुरेश मोरे, डॉ.प्रकाश दिंडे यांनी पाठपुरावा केला, याबद्दल त्यांनी आभार मानले.

1रुपयात 1 लिटर स्वच्छ पाणी या नाविन्यपूर्ण योजनेचा दुध उत्पादक माता भगिनींनी लाभ घ्यावा असे आवाहन गोकुळ चे चेअरमन विश्वासराव नारायण पाटील यांनी केले.

याप्रसंगी शिरोली दुमाला चे उपसरपंच सचिन विश्वासराव पाटील ,माजी सरपंच मारुती चव्हाण, कोटेश्वर विकास सेवा संस्थेचे चेअरमन रघूनाथ वरूटे, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष मारुती दिंडे, गोविंद काशिद आदी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ग्रामपंचायत सदस्य प्रा. तानाजी गोदडे यांनी केले ,तर आभार ग्रामपंचायत सदस्य उत्तम चव्हाण यांनी मानले.