रायगडावर होणार उत्खनन…

महाड : छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याची राजधानी असलेल्या रायगडाचे सध्या संवर्धन सुरू आहे. या कामादरम्यान रायगड किल्ल्यावरील वास्तूंचे हवाई सर्वेक्षण करण्यात आले आहे. त्याद्वारे गडावरील सुमारे साडेतीनशे वास्तूंची माहिती समोर येत आहे. राजवाडे व परिसरात उत्खनन केले जाणार आहे.

उत्खननाच्या कामातून गडाचे अनेक पैलू समोर येणार आहेत. गडाला गतवैभवही मिळणार आहे. रायगड किल्ल्याच्या वास्तूंचे हवाई सर्वेक्षण करण्यात आले असून त्याद्वारे गडावरील सुमारे ३५० वास्तूंची माहिती समोर येत आहे. रायगडाला रायरी, नंदादीप, शिवलंका, राहीर, पूर्वेकडील जिब्राल्टर आदी नावे होती. मेघडंबरी, खुबलढा बुरूज, नाणेदरवाजा, महादरवाजा, हत्ती तलाव, गंगासागर तलाव, पालखी दरवाजा, मेणा दरवाजा, राज सदर, रत्नशाळा, राजभवन, बाजारपेठ, नगारखाना, शिकाई मंदिर, जगदीश्वर मंदिर, छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी आदी ठिकाणे पाहण्यासाठी शिवप्रेमी मोठ्या संख्येने येतात.स्वराज्याची राजधानी असणाऱ्या रायगडावर येणारे शिवप्रेमी किल्ल्याची दुरवस्था पाहून दुःख व्यक्त करत होते. राजधानीला गतवैभव मिळावे अशी त्यांची मागणी होती.

त्यानुसार रायगड संवर्धनाचे काम हाती घेण्यात आले. त्यासाठी ६०७ कोटी रुपयांचा आराखडा तयार करण्यात आला. त्या माध्यमातून गडावर अनेक कामे सुरू आहेत. पुरातत्त्व संशोधन विभाग हे काम करत असून अनेक दुर्लभ माहिती यातूनच शिवप्रेमींना आगामी काळात मिळणार आहे.

रायगड किल्ल्यावरील वास्तूंचे हवाई सर्वेक्षण करण्यात आले आहे. त्याद्वारे गडावरील सुमारे साडेतीनशे वास्तूंची माहिती समोर येत आहे. राजवाडे व परिसरात उत्खनन केले जाणार आहे. राजसदरेवर उभे राहिले की समोरच दिसणारे अष्टप्रधान मंडळाचे वाडे, बाजूला असणारा राणीवसा या ठिकाणी आता उत्खननाचे काम सुरू झाले आहे.