इचलकरंजी / मन्सूर अत्तार : शहापूर येथील दत्त नगर, भाटले मळा परिसरात राहणारे नागरिक, भाटले यांच्या पडिक जागेत सुरु असणाऱ्या अवैध दारू अड्डामुळे अत्यंत त्रस्त झाले होते.
दारू पिण्यासाठी येणाऱ्या लोकांची भांडणे, मारामाऱ्या,अयोग्य वर्तणूक यामुळे सायंकाळी ७ नंतर स्त्रियांना बाहेर पडणे मुश्किल झाले होते. दि. १५/०२/२०२२ रोजी शहापूर पोलिस ठाणे येथे सकाळी ११ वाजण्याच्या दरम्यान ठाणे अंमलदार महेश कोरे यांना याबाबतचा अर्ज दिला असता त्यांनी तातडीने शहापूर पोलिस ठाण्यातील अर्जून फातले आणि त्यांच्या टीमला कार्यवाही करण्यासाठी सांगितले होते. दुपारी १ वाजण्याच्या दरम्यान सदर अवैध दारू अड्ड्यावर धाड टाकून दारूअड्डा कायमस्वरूपी बंद केला. सदरची कारवाई कार्यतत्परतेने केल्यामुळे दत्तनगर, भाटले मळा परिसरातील लोकांच्या मनात शहापूर पोलिसांप्रति आणखी आदर वाढला असल्याचे सांगून पोलिसांचे आभार मानले.