कोल्हापूर (सुरेश पाटील): आज-काल प्रामाणिकपणा हरवत चाललेला आहे. मात्र दुसरीकडे एखाद्या प्रामाणिकपणाच्या घटनेतून थोडा का असेना प्रामाणिकपणा शिल्लक असल्याचे जाणवते त्याचाच एक जिवंत उदाहरण म्हणजे जिल्हा परिषद च्या एका कर्मचाऱ्याने सापडलेला जिन्नस ज्याचा आहे त्याला परत दिला.
पैसे, सोने अथवा एखादी सापडलेली वस्तू ज्याची आहे त्या व्यक्तीला परत मिळणं हा एक नशिबाचा भाग असतो. आजच्या युगात सापडलेल्या किमती वस्तू परत करणाऱ्यामधील प्रामाणिकपणा फार दुर्मिळच पाहायला मिळतो. मात्र प्रामाणिकपणाचं एक उदाहरण कोल्हापूर जिल्हा परिषदेतील एका कर्मचार्यांच्या बाबतीत पाहायला मिळालं. जिल्हा परिषद मध्ये कामानिमित्त रवींद्र पावसकर नावाचे गृहस्थ आले होते. आणि त्यांचा सोन्याचा जिन्नस जिल्हा परिषद मध्ये हरवला. सदरचा जिन्नस जिल्हा परिषदेचे कर्मचारी रवी बनकर यांना सापडला आणि तो त्यांनी पावसकर यांना परत केला. त्यांच्या प्रामाणिकपणाबद्दल पावसकर सदगृहस्थ भारावून गेले.
पावस्कर टिंबर मार्केट कोल्हापूर येथे राहत असून कामानिमित्त जिल्हा परिषदेमध्ये आले होते. कामाच्या गडबडीमध्ये त्यांचे सोन्याचे जिन्नस हरवले, हे त्यांच्या लक्षात आले नव्हते. सदरचा जिन्नस सामान्य प्रशासन विभागातील रवीं बनकर यांना सापडला होता. बनकर यांनी आपल्याकडे असलेल्या कार्यालयीन कागदपत्रातील पावतीच्या आधारे पावसकरांचा फोन नंबर शोधून काढला आणि त्यांना बोलावून घेतले. तो सोन्याचा जिन्नस त्यांचंच असल्याची खात्री पटल्यानंतर पावस्कर यांना परत केला.
वस्तू नेमकी कोणती आहे आणि कसली आहे, यापेक्षा ज्याची आहे त्याला प्रामाणिकपणे देणे हे फार महत्त्वाचे आहे. हेच नेमके रवी बनकर यांच्या या प्रामाणिकपणा वरून सिद्ध होतंय, असं म्हणलं तरी चुकीचं ठरू नये. बनकर यांच्या प्रामाणिकपणाबद्दल जिल्हा परिषदेच्या कर्मचारी-अधिकारी वर्गातून कौतुक होत आहे.