कोल्हापूर: विविध सराव परिक्षेतून विद्यार्थ्यांचा बौध्दिक विकास होण्यास मदतच होत असून आज राधानगरी तालुक्यात होत असलेल्या प्रज्ञाशोध सराव परीक्षेचा फायदा जिल्हा परिषदकडून घेण्यात येणाऱ्या अंतिम प्रज्ञाशोध परीक्षेसाठी नक्की होईल असे प्रतिपादन कोल्हापूर जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष व भोगावती सहकारी साखर कारखान्याचे संचालक हिंदूराव चौगले यांनी केले.
ठिकपुर्ली ता.राधानगरी येथे प्रज्ञाशोध सराव परीक्षा प्रश्नपत्रिका वितरण समारंभ प्रसंगी ते बोलत होते. यावेळी चौगुले म्हणाले महाराष्ट्र पुरोगामी प्राथमिक शिक्षक संघटना व शिवम शैक्षणिक, सामाजिक संस्था या दोन्ही संघटनांचे शैक्षणिक व सामाजिक कार्य कौतुकास्पद असून आज या दोन्ही संघटनेनी या सराव परीक्षेस प्रश्न पत्रिका देऊन विद्यार्थ्यांना प्रेरणा देण्याचे अनमोल कार्य केले आहे. यावेळी बोलताना पं. स. राधानगरीचे गटशिक्षणाधिकारी बी. एम. कासार म्हणाले या सराव परीक्षेमुळे विद्यार्थ्यांना व मार्गदर्शक शिक्षकांना आपली प्रगती लक्षात येण्यास मदत होणार असून या परीक्षेचा अंतिम परीक्षेसाठी फायदा होणार आहे. शिक्षण विस्तार अधिकारी तथा परीक्षा प्रमुख ए.वाय.पाटील यांनी शिष्यवृत्ती सराव परीक्षेसोबत राधानगरी तालुक्यात पहिल्यांदाच प्रज्ञाशोध सराव परिक्षा होत असल्याचे सांगून तालुक्यातील परीक्षेस बसलेल्या 4000 परीक्षार्थी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.
दरम्यान प्रज्ञाशोध परीक्षा प्रश्नपत्रिका पुरविण्यात सहकार्य केलेल्या महाराष्ट्र पुरोगामी प्राथमिक शिक्षक संघटनेचे राज्याध्यक्ष प्रसाद पाटील, महिला राज्य सरचिटणीस शारदा वाडकर, शिवम शैक्षणिक व सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष तथा पुरोगामीचे जिल्हा प्रमुख संघटक दिगंबर टिपुगडे यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. कार्यक्रमास जिल्हा अध्यक्ष एस के पाटील, जिल्हा सरचिटणीस शंकर पवार, राज्य संघटक पी आर पाटील, राज्य कार्य. सचिव रंगराव वाडकर, राधानगरी अध्यक्ष सर्जेराव ढेरे, राधानगरी सरचिटणीस संदिप नलवडे, राधानगरी महिला अध्यक्षा जयश्री टिपुगडे, संघटक अरूण टिपुगडे यांचेसह केंद्र शाळा ठिकपुर्लीचे मुख्याध्यापक सुकुमार कांबळे, कन्या ठिकपुर्लीचे मुख्याध्यापक दत्तकुमार साबळे, प्रश्नपत्रिका निर्माती करणारे शशिकुमार पाटील,दिगंबर वाईंगडे, साताप्पा शेरवाडे, सुनील कुदळे,सुकुमार कांबळे, केंद्र संचालक प्रमोद भांदिगरे तसेच केंद्रातील मार्गदर्शक शिक्षक, परीक्षक- पर्यवेक्षक शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते. स्वागत प्रास्ताविक मुख्याध्यापक सुकुमार कांबळे यांनी केले, सुत्र संचलन साताप्पा शेरवाडे यांनी केले, आभार एकनाथ पाटील यांनी मानले.