कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा परिषद व स्वदेस फाउंडेशन मुंबई यांच्या वतीने व्हॅक्सिनेशन ऑन व्हील कार्यक्रम आजरा, चंदगड, पन्हाळा आणि शाहूवाडी तालुक्यासाठी सुरू.करण्यात आली असून संस्थेच्या ॲम्ब्यूलन्स शुभारंभ हिरवा झेंडा दाखवून भागात पाठविण्यात आला. जिल्हा परिषद अध्यक्ष श्री राहुल पाटील, यांच्या सूचनेनुसार लसीकरण कार्यक्रमास सर्वसमावेशक होणेसाठी समाजातील सर्व घटकांचा सहभाग अत्यंत गरजेचा आहे. यासाठी नागरिक, सर्व शासकीय विभाग, स्वयंसेवि संस्था यांचा कोवीड लसीकरणासाठी सहभाग घेणे आवश्यक आहे.
आजरा, चंदगड, पन्हाळा आणि शाहूवाडी तालुक्यातील दुर्गम क्षेत्र, कमी लसीकरण असलेला भाग, बाजपेठेचा भाग, मोठी गांवे इ. ठिकाणी सदरची ॲम्ब्यूलन्स जाणार आहे या बाबतचे सविस्तर नियोजन तालुका आरोग्य अधिकारी यांचे मार्फत देण्यात येणार आहे असे जिल्हा आरोग्य अधिकारी, डॉ योगेश साळे यांनी सांगितले. तसेच स्वदेस फाऊंडेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी मंगेश वांगे व संचालक राहुल कटारिया व महाव्यवस्थापक डॉ.सुरेंद्र यादव व व्यवस्थापक डॉ. सचिन आहिरे यांच्या संकल्पनेमधून स्वदेस फाउंडेशन चा व्हॅक्सिनेशन ऑन व्हील हा कार्यक्रम नाशिक व रायगड जिल्ह्यांमध्ये सुरू आहे. हाच कार्यक्रम कोल्हापूर जिल्ह्यामधील आजरा, चंदगड, पन्हाळा आणि शाहूवाडी तालुक्यामध्ये जिल्हा परिषद कोल्हापूर व स्वदेस फाउंडेशन च्या वतीने सुरू करण्यात येत आहे. व्हॅक्सिनेशन ऑन व्हील यामध्ये ए .एन .एम, डेटा एंट्री ऑपरेटर, ड्रायव्हर ,ॲम्बुलन्स व ॲम्बुलन्स ला लागणारे इंधन स्वदेस फाउंडेशन च्या वतीने देण्यात येत आहे अशी माहिती स्वदेस फाउंडेशन चे उपसंचालक तुषार इनामदार यांनी दिली.
स्वदेस फाउंडेशन यांच्यावतीने रायगड व नाशिक जिल्ह्यामध्ये तीन हजार गावांमध्ये आरोग्य ,शिक्षण ,उपजीविका व आर्थिक विकास व ग्रामीण सक्षमीकरणाचे काम ग्रामस्थांच्या सहकार्याने मधून करत आहे. कोरोना च्या दुसऱ्या लाटेमध्ये स्वदेस फाउंडेशन च्या वतीने कोल्हापूर यांना मदत केली आहे.
जिल्हा परिषद कोल्हापूर व स्वदेस फाउंडेशन मुंबई यांचे वतीने व्हॅक्सिनेशन ऑन व्हील कार्यक्रम आजरा, चंदगड, पन्हाळा आणि शाहूवाडी तालुक्यासाठी सुरू.करण्यात आली असून संस्थेच्या ॲम्ब्यूलन्स शुभारंभ हिरवा झेंडा दाखवून भागात पाठविण्यात आला. या प्रसंगी शुभारंभ कार्यक्रमास आरोग्य व बांधकाम समिती सभापती, सौ वंदना अरुण जाधव, मुख्यकार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद कोल्हापूर कोल्हापूर श्री संजयसिंह चव्हाण, जिल्हा माता बाल संगोपन अधिकारी, डॉ फारुख देसाई, सहा. जिल्हा आरोग्य अधिकारी, डॉ उत्तम मदने उपस्थित होते.