येवतीच्या विकासासाठी वचनबद्ध- राहुल पाटील

कोल्हापूर: आमदार पी.एन.पाटील-सडोलीकर यांच्या फंडातून येवती गावास 20 लाखाचा निधी दिला असून येवती गावच्या सर्वागिण विकासासाठी वचनबद्ध असल्याचे प्रतिपादन जिल्हा परीषदेचे अध्यक्ष राहुल पाटील सडोलीकर यांनी केले.

येवती ता.करवीर येथे आ.पी.एन.पाटील सडोलीकर यांच्या विकास निधीतून मंजूर विकास कामांच्या उद्धाटनप्रसंगी पाटील बोलत होते.करवीर विधानसभा मतदारसंघात आ.पाटील यांनी कोटयावधी रूपयांचा निधी दिला आहे.जिल्हा परीषदेच्या माध्यमातूनही विकासकामे सुरु आहेत.त्यामुळे करवीर मतदारसंघ विकासाच्या बाबतीत आघाडीवर आहे,असेही पाटील यांनी सांगितले.

या निधीतून अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेले गावातील मुख्य रस्त्यावरील गटर्सच्या कामाचा शुभारंभ करण्यात आला.सरपंच वीरधवल पाटील यांनी स्वागत केले.कार्यक्रमालाउपसरपंच संतोष कांबळे, माजी उपसरपंच धनाजी पाटील, वाय.जी.पाटील, माजी सरपंच संभाजी पाटील, कैलास शेळके, प्रकाश पाटील, एकनाथ पाटील, सतीश पाटील, शरद आळवेकर, उत्तम पाटील,निवास सुतार, विक्रम पाटील, संग्राम गुरव, आजम मुल्लानी, शहाजी पाटील, आनंदा पाटील तसेच आजी माजी पदाधिकारी, ग्रामस्थ उपस्थित होते.श्रीपतरावदादा बँकेचे संचालक रणजित शेळके यांनी आभार मानले.