कागल चे नगरसेवक विशाल मळगेकर यांचे आकस्मित निधन

कागल : कागल नगरपालिकेचे तरुण नगरसेवक व राजे विक्रम सिंह घाडगे को-ऑपरेटिव्ह बँकेचे संचालक विशाल नामदेवराव पाटील मळगेकर वय 35 यांचे आकस्मिक निधन झाले आहे.

सकाळी त्यांना अस्वस्थ वाटू लागले. उलट्या सुरू झाल्या होत्या. त्यादरम्यान उपचाराला नेत असताना त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका येऊन त्यांचा मृत्यू झाला.

कागल शहर व परिसरात शोककळा पसरली आहे विशाल पाटील हे बांधकाम व्यवसायिक म्हणूनही शहर व परिसरात परिचित आहेत. तसेच अनेक संस्थाशी त्यांचा घनिष्ठ संबंध आहे. त्यांच्या निधनामुळे शहरात शोककळा पसरली आहे.