कोल्हापूर: किराणा दुकानात वाईन विक्री परवाना हा सरकारने घेतलेला निर्णय रद्द करावा अन्यथा कोल्हापूर जिल्ह्यात प्रत्येक तहसीलदार कार्यालयासमोर आंदोलन केले जाईल अशा आशयाचे पत्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना जिल्हाधिकारी कोल्हापूर यांच्यामार्फत भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलन कोल्हापूर जिल्हा यांच्या वतीने देण्यात आले.
यावेळी जिल्हाध्यक्ष नारायण पोवार, शरद मिराशी, बाजीराव पाटील, सुशील हणजे, धनाजी पाटील, प्रल्हाद सुतार, जुबेर मुजावर, मिलिंद देसाई, कार्यकर्ते उपस्थित होते.