गगनबावडा : रिलायन्स फाउंडेशन व पशुसंवर्धन विभाग जिल्हा परिषद, कोल्हापूर यांच्यावतीने शेळोशी, ता. गगनबावडा येथे जनावरांचे वंध्यत्व निवारण व तपासणी शिबिर घेण्यात आले. या शिबिरामध्ये गाय व म्हैस यांची तपासणी करण्यात आली.
जनावरांच्या काळामध्ये समस्या माजावर न येणे गाबन न राहणे याविषयी तपासणी आणि सोनोग्राफी करण्यात आली व औषध उपचार करण्यात आले. तसेच मस्टाटीज या रोगाविषयी तपासणी व उपचार करण्यात आले तसेच या रोगा संबंधित माहिती शेतकऱ्यांना देण्यात आली. जनावरांचा भाकड काळ कमी करण्याविषयी उपचार करण्यात आले या शिबिरामध्ये सुमारे म्हैस , गाय, वासरू व शेळ्या अशा एकूण 260 हून अधिक वंधत्व निवरणाचे उपचार करण्यात आले. तसेच जनावरांना दूध वाढीसाठी आवश्यक कॅलशियमच्या बॉटल मोफत देण्यात आल्या . इतर जनावरांना जंत नाशक औषधे देण्यात आले . अशा प्रकारे रिलायन्स फाउंडेशन कडून वेळोवेळी पशुसंवर्धन विभाग जिल्हा परिषद, कोल्हापूर यांच्या मदतीने पशुपालकांसाठी व शेतकर्यांसाठी शिबीरे घेण्यात येतात. या शिबिरासाठी वैद्यकीय टिम म्हणून डॉ. सॅम लुद्रीक ,डॉ. दीपक तेली,यांनी जनावरांना वंध्यत्व तपासणी व उपचार करण्यात आले. तसेच डॉ. सॅम लुद्रीक ,डॉ. दीपक तेली यांनी उन्हाळ्यातील जनावरांचे आरोग्य व्यवस्थापन या विषयी सुद्धा मार्गदर्शन करण्यात आले. या कार्यक्रमामध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील गगनबावडा तालुक्यातील, शेळोशी गावामध्ये या वंध्यत्व तपासणी व निवारण शिबिर या शिबिरा मध्ये 52 हून पशुपालक सहभागी झाले होते. या कार्यक्रमामध्ये रिल्यानस फाऊंडेशनचे जिल्हा व्यवस्थापक मारुती खडके व नवनाथ माने, आणि शेळोशी गावातील पशुपालक उपस्थित होते.