पिराचीवाडी: पिराचीवाडी ता. कागल येथील शिवसृष्टीसह श्री. महादेव मंदिर व श्री हनुमान मंदिर परिसर यांच्या सुशोभीकरणासाठी पावणेदोन कोटी रुपये निधी मंजूर झाला आहे. ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या यशस्वी पाठपुराव्याने प्रादेशिक पर्यटन विकास योजनेतून हा निधी मंजूर झाला आहे.
याबद्दल पिराचीवाडीकर ग्रामस्थांनी कृतज्ञतेच्या भावनेतून ग्रामविकास मंत्री नामदार हसनसाहेब मुश्रीफ यांचा सत्कार केला. मंत्री श्री. मुश्रीफ म्हणाले, कागल तालुक्यातील पिराचीवाडी हे उंचच-उंच डोंगर माथ्यावर वसलेले एक कोरडवाहू गाव. अफाट जिद्द आणि तळमळीच्या जोरावर सरपंच सुभाष भोसले यांनी या गावाचा चेहरामोहराच बदललेला आहे. हे गाव सर्वांगसुंदर गाव म्हणून राज्य पातळीवर नेण्यासाठी प्रयत्नशील प्रयत्न करू सरपंच सुभाष भोसले म्हणाले, ग्रामविकास मंत्री नामदार हसनसाहेब मुश्रीफ यांच्या नेतृत्वाखाली गावाने विकास कामांमध्ये फार मोठी झेप घेतलेली आहे. भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या येथील श्री. गहिनीनाथ गैबी पीर या ब वर्ग दर्जा प्राप्त धार्मिक स्थळाचाही दोन कोटी निधी प्रस्तावित आहे.सरपंच सुभाष भोसले, उपसरपंच कृष्णात भोसले, माजी उपसरपंच ज्ञानदेव पाटील, माजी सैनिक रामदास भोसले, माजी पोलीस पाटील बाजीराव रोडे, श्री. पी. डी. भोसले, टी. व्ही. पाटील, दत्तात्रय दाभोळे, संभाजी भोसले, दत्तात्रय सुतार, एच. डी. भोसले आदी प्रमुख उपस्थित होते.