पुणे: प्रत्येक वर्षी १४ फेब्रुवारीला जगभरात व्हॅलेंटाइन डे साजरा केला जातो. ७ फेब्रुवारीपासून व्हॅलेंटाइन वीक साजरा करण्यास सुरुवात होते.७ फेब्रुवारी हा दिवस रोझ डे म्हणून साजरा करतात. या दिवशी अनेक प्रेमी आपल्या प्रिय व्यक्तीला गुलाबाचे फुल देऊन आपले प्रेम व्यक्त करतात.गुलाबाच्या फुलाला व्हेंलटाईन डेच्या निमित्त विशेष महत्व आहे. त्यामुळे व्हेंलटाईन डे पर्यंत गुलाबाच्या फुलांना बाजारामध्ये चांगला भाव मिळणार आहे.
पुण्याच्या मावळमधील गुलाब दरवर्षी परदेशात पाठवला जातो. यावर्षी मात्र याउलट चित्र असून भारतातील स्थानिक बाजारपेठेत चढ्या दराने गुलाबाच्या फुलाला भाव मिळत आहे.तर १४ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या व्हेंलटाईन डेसाठी देशभरातील स्थानिक बाजारपेठांमध्ये गुलाब फुलांना मागणी असल्याने शेतकऱ्यांना समाधानकारक दर मिळत आहेत. यामुळे गुलाब उत्पादक शेतकऱ्यांमध्ये आनंदी वातावरण आहे.