कोल्हापूर (प्रतिनिधी) : येथील राजर्षि शाहू गव्हर्मेंट को-ऑप बँकेने १०५ व्या वर्षात पदार्पण केले आहे. शतकोत्तर वाटचाल करणारी शासकीय कर्मचाऱ्यांची बँक म्हणून यथोचित गौरविलेली राज्यातील राजर्षि शाहू गव्हर्मेंट हे एकमेव बँक आहे.
२९ जानेवारी रोजी झालेल्या संचालक मंडळाच्या सभेमध्ये ठेवीवरील व्याजदरात पुन्हा एकदा वाढ केली असून तो ६.७५% इतका करण्यात आला आहे. याची अंमलबजावणी १ फेब्रुवारी २०२२ पासून नवीन ठेवण्यात येणाऱ्या ठेवींकरीता लागू राहणार आहेत. बँकेमार्फत वाढविण्यात आलेल्या ठेव व्याजदराचा सर्व सभासद तसेच ग्राहकांनी लाभ घ्यावा असे आवाहन बँकेचे अध्यक्ष रविंद्र पंदारे आणि संचालक मंडळातर्फे करण्यात आले आहे.
यावेळी बँकेचे उपाध्यक्ष संजय खोत, संचालक शशिकांत तिवले, मधुकर पाटील, अतुल जाधव, रोहित बांदिवडेकर,विलासराव कुरणे, रमेश घाटगे, सदानंद घाटगे, अजित पाटील, संचालिका हेमा पाटील, श्रीमती मनुजा रेणके, किशोर पोवार, अरविंद आयरे, तज्ञ संचालक दिलीप मिरजे, विनायक कांबळे, बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुरेश शिंदे आदी उपस्थित होते.