सोलापूर-अक्कलकोट महामार्गावर विचित्र अपघात

सोलापूर- : सोलापूर-अक्कलकोट महामार्गावर आणखी एक भीषण अपघात झाला. यामध्ये 6 जण गंभीर जखमी झाल्याची बातमी समोर आली आहे.आज पहाटे सहा वाजण्याच्या सुमारास वळसंग पोलीस ठाणे हद्दीतील कुंभारी येथील टोल नाका येथे ट्रक (KA 32 B 1777), चारचाकी (MH 25 AL4070), बलकर ट्रक (MH 12 SX 1171) आणि आणखी एक ट्रक (TN 52 J3679) या चार गाड्यांची एका मागून एक धडक झाली.

चार जणांचा मृत्यू झाल्याची शक्यता बोलली जात आहे.सदर घटनेची माहिती मिळताच पोलीस अधिकारी अतुल भोसले, अजय हांचाटे, पोलीस कर्मचारी दासरी, वाळूनजकार, बनकर, गायकवाड, होनमोरे, मोरे, सूर्यवंशी, काळोखे यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. क्रेन आणि रुग्णवाहिका यांच्या सहाय्याने चारचाकीमध्ये अडकेल्या जखमींना बाहेर काढण्याचे काम सुरू आहे. मदतकार्य २ तास सुरू होते.