कोल्हापूर: राज्य शासनाच्या वतीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील सर्व व्यवसायिक यांचे फलक मराठी करावे असा निर्णय घेतला आहे. मराठीपणा जपण्यासाठी ते अत्यंत गरजेचे आहे, महाराष्ट्राने नेहमीच स्वाभिमानी अस्मिता आणि अभिमान जपला आहे त्याच पद्धतीने गांधीनगर बाजारपेठेतील व्यापारी बंधूनी मराठी अस्मिता व अभिमान जपण्यासाठी व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आवाहनाचा सन्मान राखून सर्व व्यापारी बंधूंनी आपल्या दुकानांचे फलक ठळक असे मराठीत करावेत दुकानाचे नाव असेल ते मराठीत ठळक अक्षरात असावे.
महाराष्ट्रातील सर्व दुकाने, आस्थापना, वाणिज्यिक संस्था, उपहारगृहे, आहार गृहे इत्यादींचे नामफलक मराठीत लिहिण्याबाबत शासनाने ३१ मे २००८ रोजीच्या परिपत्रकाद्वारे सुचित केले आहे, तरी सर्व व्यापारी बंधूनी आपल्या दुकानाचे बोर्ड मराठीत लिहावेत असे आवाहन करवीर शिवसेनेच्या वतीने व्यापाऱ्यांना करण्यात आले.
यावेळी करवीर तालुका प्रमुख राजू यादव, गांधीनगर प्रमुख दिलीप सावंत, शाखाप्रमुख दिपक अंकल, उपशाखाप्रमुख सुनील पारपाणी,बाळासाहेब नलवडे, योगेश लोहार, किशोर कामरा, चंद्रकांत पाटील, गांधीनगर उपप्रमुख दिपक पोपटाणी, विभागप्रमुख बाबुराव पाटील,दिपक पोपटाणी फ्रेमवाला तसेच व्यापारी असोसिएशनच्या वतीने होलसेल व्यापारी असोसिएशनचे उपाध्यक्ष अशोक टेल्यानी, सिंधी सेंट्रल पंचायतचे गुवालदास जे. कट्टार, रिटेल व्यापारी अध्यक्ष दिलीप कुकरेजा आदींनी निवेदन स्वीकारले.यावेळी व्यापाऱ्यांनी करवीर शिवसेनेच्या आवाहानाला सकारात्मक प्रतिसाद देत लवकरात लवकर फलक मराठीत करू असे आश्वासन दिले.