कोल्हापूर : प्रत्येक मराठी महिन्याच्या कृष्ण पक्षातल्या चतुर्थीला संकष्ट चतुर्थी असं म्हणतात. त्या दिवशी उपवास करून गणेशाची आराधना करण्याची परंपरा आहे. आज वर्षातील पहिली संकष्टी चतुर्थी आहे. जाणून घेऊयातआजच्या दिवसाचे महत्त्व…
हिंदू पंचांगानुसार प्रत्येक मराठी महिन्याच्या कृष्ण पक्षात येणाऱ्या चतुर्थीला संकष्ट चतुर्थी किंवा संकष्टी चतुर्थी म्हणतात. साधारणपणे एका वर्षात १२ आणि अधिकमास आल्यास १३ संकष्ट चतुर्थी येतात. गणपतीचे भक्त हा दिवस विशेष भक्तिभावाने साजरा करतात. गणेशाच्या उपासनेत या दिवसाचे महत्व विशेष आहे. चंद्रदर्शन हा या व्रताचा महत्वाचा भाग आहे. नविन वर्षाची पहिली संकष्ट चतुर्थी शुक्रवार २१ जानेवारीला असून, ही साल २०२२ मधील पौष कृष्ण संकष्टी चतुर्थी आहे.
पौष कृष्ण संकष्ट चतुर्थी प्रारंभ : शुक्रवार २१ जानेवारी २०२२, ८ वाजून ५१ मिनिटे
पौष कृष्ण संकष्ट चतुर्थी समाप्ती : शनिवार २२ जानेवारी २०२२, ९ वाजून १४ मिनिटे