मुंबई : शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी विहंग गार्डनमध्ये केलेल्या अनधिकृत बांधकामासाठी आकारण्यात आलेल्या दंड व व्याजमाफीच्या राज्य सरकारच्या निर्णयाविरुद्ध लोकायुक्तांकडे दाद मागणार असल्याचे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.
सरनाईक यांच्या अनधिकृत बांधकामाविरोधात भाजपने आता आक्रमक भूमिका घेतली आहे.सरनाईक यांच्या प्रकल्पाला करण्यात आलेला दंड व त्यावरील व्याज माफ करण्याच्या राज्य मंत्रिमंडळाच्या निर्णयाच्या विरोधात ठाण्यात भाजपचे आमदार संजय केळकर यांनी आवाज उठविला होता, तर भाजप नगरसेवकांनी निदर्शने केली. आता प्रदेशाध्यक्ष पाटील यांनी लोकायुक्तांकडे धाव घेण्याचे जाहीर केले आहे. शिवसेना आमदाराच्या विरोधात भाजपने जाहीरपणे विरोधी भूमिका घेतली आहे.