इचलकरंजी: स्वच्छ सर्वेक्षण आणि माझी वसुंधरा अभियानां तर्गत इचलकरंजी नगर परिषदेच्या विविध उपक्रम राबविले जात आहेत. या अनुषंगाने स्वच्छतेसह शहरातील विविध ठिकाणी आढळून येणारे कचरा कोंडाळे हटवुन त्या ठिकाणचे सुशोभीकरण करणेत येत आहे.
या मोहिमेत आज शहरातील मुख्य रस्त्यावरील शाळा क्रमांक दोन नजीकचा आणि वॉर्ड क्रमांक २ राम जानकी हॉल जवळ या दोन ठिकाणचे कचरा कोंडाळे हटवुन सदर जागा सुशोभित करणेत आल्या. याचबरोबर शहरातीलछोट्या विक्रेत्याजवळ जमा होणारा कचरा इतरत्र कोठेही टाकलाजावु नये यासाठी अशा विक्रेत्यांना नगरपरिषदेमार्फत डस्टबिनचे वाटपआज प्रशासक तथा मुख्य अधिकारी डॉ. प्रदीप ठेंगल यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळीविक्रेत्यांना कोव्हिडच्यासर्व नियमांचे पालन करणे बाबत सक्त सुचनाकरणेत आल्या.
आजच्या या मोहिमेतकामगार अधिकारी विजय राजापुरे, मुख्य स्वच्छता निरिक्षक सुर्यकांत चव्हाण, संगणक अभियंता संतोष पवार,जनसंपर्क अधिकारी नितिन बनगे, स्वच्छता निरिक्षक विजय पाटील, संपत चव्हाण, सर्जेराव पाटील,पालक अधिकारी शितल पाटील, बेबी नदाफ, अतिक्रमण विभाग प्रमुख सुभाष आवळे यांचे सह आरोग्य आणि अतिक्रमण विभागाकडील कर्मचारी उपस्थित होते.