कराड: कोरोनाचा फैलाव पुन्हा वाढू लागला आहे. त्यामुळे प्रशासनाने बेडसह अन्य यंत्रणेची सज्जता ठेवली आहे. याकाळात ऑक्सिजनची कमतरता भासू नये यासाठी प्रशासनाने कराड येथील वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालयात ऑक्सिजन प्लांट कार्यान्वित केला आहे. त्याचबरोबर रुग्णांच्या वाढत्या ऑक्सिज ऑक्सिजनच्या बाबनची गरज ओळखून कराड येथील कृष्णा हॉस्पिटलनेही ऑक्सिजन प्लांट सुरू केला आहे.
गेल्या काही दिवसापासून कराड तालुक्यातील कोविड बाधितांची संख्या वाढू लागलेली आहे. सध्या रूग्णालयात अॅडमिट होणाऱ्यांची संख्या मोठी नसली तरी खबरदारी म्हणून ऑक्सिजनची मोठ्या प्रमाणात गरज भासते. त्यासाठी त्यांना कृत्रिम ऑक्सिजन द्यावा लागतो. मागील दोन लाटांमध्ये अनेकांना वेळेत ऑक्सिजन न मिळाल्याने त्यांचा मृत्यू झाल्याच्या घटना घडल्या आहेत. त्याचबरोबर त्यावेळी ऑक्सिजनचा तुटवडाही निर्माण झाला होता. त्यामुळेही रुग्णांचे मोठे हाल झाले होते.या सर्वांचा विचार करून प्रशासनाने रुग्णांना वेळेत ऑक्सिजन मिळावा आणि तो अखंडित मिळावा यासाठी कराड येथील वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालयात ऑक्सिजन प्लांट कार्यान्वित करण्यात आला आहे. त्यासाठीची कार्यवाही पूर्ण झाली असून, त्याची चाचणी घेऊन तो प्लांट सुरू करण्यात आला आहे. त्याचबरोबर वाढत्या ऑक्सिजनची गरज ओळखून कराड येथील कृष्णा हॉस्पिटलनेही ऑक्सिजन प्लांट सुरू केला आहे.