कोल्हापूर : तमाम कष्टकरी ,श्रमीक, सर्वसामान्य बांधकाम कामगारांच्या न्याय हक्कासाठी शासनाने “बांधकाम कल्याणकारी” मंडळाच्या महत्वपूर्ण निर्णय होऊन तो अमलात सुद्धा आणला आहे .तथापि बांधकाम कल्याणकारी महामंडळाच्या सभासद नोंदणीकरिता कोल्हापूर छ. शाहू मार्केट यार्ड ऑफिस मधील काही कर्मचारी व एजंट कडून मुळ योजनेला कलंकित करून आणि सर्वसामान्य कामगारांच्या परिस्थितीचा गैरफायदा घेत आहेत.
आधीच लॉक डाऊन, कोरोना, व्यवसाय मंदी यांच्या भयावह संकटामध्ये सापडलेल्या कामगारांची नोंदणी॑॑साठी आर्थिक लूट करून स्वतः गब्बर होत आहेत. शासनाची दिशाभूल आणि कामगार वर्गाची मोठी फसगत करून सदरचे दलाल सभासद नोंदणी करिता प्रत्येकी अव्वा ते सव्वा हजार रुपये घेऊन हतबल कामगारांचे कंबरडे मोडीत आहेत. या दलालांची भ्रष्ट दुकानदारी रोजरोसपणे बिना दिक्कत सुरू असून यावर जबाबदार यंत्रणेचा कसलाही अंकुश नाही ही संतापजनक बाब आहे. कामगारांची आर्थिक पिळवणूक करणारे दलाल आणि त्यांना पाठीशी घालणारे काही भ्रष्ट ,बेजबाबदार, कर्तव्यहिन कर्मचारी यांची सांगड या वाईट वृत्तीला आहे असे समजले तर वावगे ठरणार नाही.
आचार संहिता संपल्यानंतर या तथाकथीत कामगार नोंदणी एजंटनी किती कामगारांची नोंदणी केली, कुणाला किती कार्ड दिली गेली, कधी दिली गेली सर्व सभासदांची नावे आणि पत्ते यांची माहिती “हिंद भारतीय जनरल कामगार सेनेला “आठ दिवसात पुढील कारवाईसाठी मिळावीत.
हिंद भारतीय जनरल कामगार सेनेच्या वरील कामगार हितार्थ मागण्यांची योग्य आणि सकारात्मक विचार होऊन यामधील मुजोर दोषीवर कठोर आणि कडक कारवाई करावी अशी मागणी जिल्हाध्यक्ष राजू सांगावकर यांनी केली तसे न झालेस हिंद भारतीय जनरल कामगार सेना “शिवसेना” पद्धतीने तीव्र आंदोलन छेडेल आणि याची पूर्ण जबाबदारी यामधील दलाल आणि कामगार सहाय्यक आयुक्त सो कार्यालय यांचेवर राहील.