कोल्हापूर: कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर करवीर निवासिनी श्री अंबाबाई आणि दख्खनचा राजा जोतिबाच्या दर्शनासाठी आता तासाला केवळ चारशे भाविकांनाच ऑनलाईन बुकींग करून दर्शन मिळणार आहे.
सकाळी सहा ते रात्री नऊपर्यंत मंदिर दर्शनासाठी खुले राहील. एकूण पंधरा तासात सहा हजार भाविकांना दर्शनाची सुविधा मिळणार आहे. याबाबतचा निर्णय आज पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या वतीने सचिव शिवराज नाईकवाडे यांनी जाहीर केला. लॉकडाऊननंतर मंदिर दर्शनासाठी खुले झाल्यानंतर दर्शनासाठी ई-पास बंधनकारक करण्यात आला असून, सध्या तासाला पंधराशे भाविकांना ऑनलाईन बुकींग करून दर्शन घेता येत होते. पण, आता दिवसा जमावबंदी आणि एकूणच कोरोना प्रतिबंधात्मक नियम कडक झाल्याने दर्शनावर पुन्हा मर्यादा आणली गेली आहे.