उचगावमध्ये करवीर शिवसेनेतर्फे मीनाताई ठाकरे यांना अभिवादन….

उचगाव : स्वर्गीय मीनाताई ठाकरे यांना जयंतीदिनी अभिवादन करताना शिवसेना महिला आघाडीच्या सौ स्वाती यादव, राजू यादव, बाबुराव पाटील, छाया घोरपडे, मीना पवार आदी.

उचगाव : स्वर्गीय सौ. मीनाताई ठाकरे यांचा ९१ वा जयंती दिन म्हणजेच ममता दिन करवीर तालुका शिवसेनेच्यावतीने येथे साजरा करण्यात आला. मीनाताई ठाकरे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

स्व. मीनाताई ठाकरे यांच्या प्रतिमेस महिला आघाडीच्या सौ. स्वाती राजू यादव यांच्या हस्ते पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला. तालुका प्रमुख राजू यादव, विभागप्रमुख बाबुराव पाटील, बाळासाहेब नलवडे, छाया घोरपडे यांनी मीनाताई ठाकरे यांच्या बद्दल मनोगत व्यक्त केले. मिना पवार, मालुताई मोरे, अलका यादव, जयश्री यादव आदीसह महिला शिवसैनिक उपस्थित होत्या.