शिराळा: शिराळा शहरानजीक गोरक्षनाथ मंदिर, कापरी, जांभळेवाडी, धुमाळवाडी परिसरात चार गवे आज एकाचवेळी दिसले. त्याचप्रमाणे बिऊर, पावलेवाडी, भाटशिरगाव परिसरात आठ गव्यांचे दर्शन झाले.
एकाच दिवशी या सार्याच भागात बारा गवे दिसल्याने शेतकरीवर्गात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.दरम्यान, याच भागात बिबट्याचाही वावर आहे, सुुजयनगर येथे गवे उसामध्ये शिरल्यावर उसाच्या फडातून बिबट्या बाहेर पडला. यामुळे नागरिकांची एकच तारांबळ उडाली.बुधवारी सकाळी साडेसहाच्या सुमारास जांभळेवाडीत नाळ व बामन उगळी परिसरात चार गवे ग्रामस्थांना दिसले. त्यांना लोकांनी हुसकावले. सुजयनगर परिसरात हे गवे एका उसाच्या फडात शिरले. त्याचवेळी उसातून बिबट्या बाहेर आला. त्यामुळे लोकांची एकच धावपळ उडाली.
बिबट्या, गवा एकाचवेळी या परिसरात वावरत असल्याने लोकांमध्ये भीती निर्माण झाली आहे. भागाईवाडी परिसरातदेखील आज 8 गव्यांचे लोकांना दर्शन झाले आहे . शिराळा शहरा नजीक असणार्या गोरक्षनाथ मंदिर, कापरी, जांभळेवाडी, धुमाळवाडी परिसरात चार तसेच बिऊर, पावलेवाडी, भाटशिरगाव परिसरात आठ अशा बारा गव्यांचे दर्शन झाले आहे. दोन गव्यांचे कळप या परिसरात असल्याने भीतीचे वातावरण आहे.