कोल्हापूर : परिवर्तन संघटनेने गेल्या पंधरा वर्षात रेशनवरील धान्याच्या काळ्याबाजारात विरोधात आक्रमकपणे रस्त्यावर उतरून धडक कारवाई करण्यास प्रशासनाला भाग पाडले आहे. अनेक दुकाने निलंबित करून शेकडो दुकानांवर कारवाई करण्यास प्रशासनाला भाग पाडले आहे .
या पार्श्वभूमीवर जयसिंगपूर येथे असणाऱ्या जयसिंगपूर सेवा सोसायटीच्या रास्त भाव दुकान क्रमांक 2/3/5 याठिकाणी धान्याचा काळाबाजार होत असल्याचे परिवर्तनाच्या निदर्शनास आल्यानंतर संघटनेचे अध्यक्ष संजय पाटील यांच्या नेतृत्वाखाली येथील कार्यकर्त्यांनी सदर दुकानावर पाळत ठेवून आज बोलेरो टेम्पो क्रमांक एम एच 09 0686 यामध्ये अंदाजे 30 ते 40 पोती रेशनचे धान्य भरून नेताना दुकानासमोरच टेम्पो पकडला त्यानंतर टेम्पो चालक तेथून टेम्पो घेऊन फरार झाला त्यावेळी दुकान चालक व टेम्पो चालक यांनी आमच्या पोटावर पाय आणू नका काहीतरी आर्थिक देणे-घेणे करून तेथेच विषय मिटवा असे म्हटल्याचे व्हिडिओ शूटिंग परिवर्तन संघटनेने घेतले असून ते शूटिंग जिल्हा पुरवठा अधिकारी दत्तात्रय कवितके आणि तहसीलदार अपर्णा मोरे यांना परिवर्तन संघटनेने पाठवून देऊन दुकान निलंबित करून फौजदारी करण्याची मागणी संजय पाटील यांनी त्यांच्याशी चर्चा करून केली त्यानुसार अपर्णा मोरे यांनी प्रत्यक्ष घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला रेशन दुकानाची तपासणी केली असता तांदूळ 24 पोती आणि गहू 27 पोती ज्यादा आढळून आलेला आहे तो कोठून आला कोणाचा आहे याची चौकशी सुरू असून ही पोती तहसीलदार अपर्णा मोरे यांनी जप्त केली आहेत त्याचबरोबर 30 ते 40 पोती घेऊन टेम्पो चालक फरार झालेला असून दुकानदार व टेम्पोचालक यांच्यावर गुन्हा दाखल करण्याच्या अनुषंगाने आरटीओ यांच्याशी मोरे यांनी संपर्क साधून टेम्पो चा नंबर कळविला आहे. पुरवठा निरीक्षक अरुण माळगे यांनी पंचनामा केला असून दुकानदारावर आज गुन्हा दाखल करून रेशन दुकान सील करण्यात येणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.