कोल्हापूर : 3 जानेवारी सावित्रीबाई फुले दिनाचे औचित्य साधून महाराष्ट्र पुरोगामी प्राथमिक शिक्षक संघटनेच्या वतीने दिला जाणारा क्रांतिज्योती सावित्रीची लेक २०२२ हा पुरस्कार १ शिक्षण विस्तार अधिकारी २ केंद्र प्रमुख यांचेसह ४० मुख्याध्यापिका यांना नुकताच जाहीर करण्यात आला असल्याची माहिती संघटनेने प्रसिध्द पत्रकाद्वारी दिली आहे.
महात्मा जोतिबा फुले व क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांनी मुलींच्या शिक्षणाची दारे खुली केल्याने आज विविध क्षेत्रात उच्च पदावर अनेक महिला कार्यरत असून त्या सक्षमपणे सेवा बजावत आहेत. त्यातीलच एक भाग म्हणून जिल्हा परिषद शाळांमधील मुख्याध्यापक पदावर कार्यरत असलेल्या महिला मुख्याध्यापिकांचा सन्मान करण्याचे नियोजन चालू वर्षी संघटनेने करून हे पुरस्कार जाहीर केले आहेत.
पं.स.गडहिंग्लजच्या शिक्षण विस्तार अधिकारी विद्या चौगुले, हसूर दु.च्या केंद्र प्रमुख शांता वाकुडे, वाशी केंद्राच्या केंद्र प्रमुख मनिषा सपाटे, तसेच आजरा तालुक्यातील मुख्याध्यापिका विमल चौगुले- मडिलगे, गडहिंग्लज मधील रश्मी करंबळे- करंबळी, जयश्री रावण- हसूरचंपू, जयश्री साखळकर- लिंगनूर क.नूल, शकुंतला डंगी-कडलगे, वैजंयतीमाला रजपूत- निलजी, करवीर मधील शशिकला पाटील-हलसवडे , अनिता तोडकर- कन्या वाशी, माया पोवार- कु.वाशी, मंगल देसाई – बाचणी, बेबीनंदा मधाळे- नंदगांव, शोभा पाटील- दोनवडे, शोभाताई देसाई- गो.शि.नं.२, सुलभा पाटील- पाडळी खुर्द, मीना वळवी- खाटांगळे, रंजना कुंमार- गांधीनगर नं.३, मंगल चौगुले- बोलोली, प्रमिला वळवी- दिंडनेर्ली, हातकणंगले मधील शांता व्हनबट्टे- न्यू राजापूर, स्नेहलता शेटे- कबनूर, शहनाज सनदी- संजीवन चंदूर, संगिता भरमगोंडा- पु.शिरोली, प्रमिला चव्हाण- यळगुड शिरोळ मधील कल्पना घोळवे- कुरूंदवाड नं.१, अरूता शहापुरे- बुबनाळ, वत्सला दाभाडे- कु.तेरवाड, विजया पाटील- नरसिंहवाडी, मंगल पुजारी छ.शिवाजी शिरोळ नं.३, आकाशी तकडे- उमळवाड, कागल मधून जयश्री भोई, सुनंदा कोरवी- रामकृष्ण नगर, निर्मला पाटील- लिंगनूर, भुदरगड मधून लतादेवी कुंभार- मडिलगे बु., सुनिता इंगळे- कोनवडे, पन्हाळा मधून सुमन पोवार कुशिरे तर्फ पोहाळे, वर्षा सोनवणे- सातार्डे, चंदगड मधून गीतांजली- अमरोळी, गीता खांडेकर- कानुर खुर्द, अर्चना शिंदे- तुर्केवाडी, शाहुवाडी मधून- सौख्या शिंदे यांना पुरस्कार जाहीर झाला आहे.
पुरस्कार वितरण शनिवार ८ जानेवारी रोजी शिक्षण समिती सभापती रसिका पाटील यांचे अध्यक्षतेखाली, जिल्ह्यात परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण, प्राथमिक शिक्षणाधिकारी आशा उबाळे यांच्या हस्ते संघटनेचे राज्याध्यक्ष प्रसाद पाटील, महिला राज्य सरचिटणीस शारदा वाडकर यांचे उपस्थित संपन्न होणार आहे. पत्रकावर संघटनेचे राज्याध्यक्ष प्रसाद पाटील, महिला राज्य सरचिटणीस शारदा वाडकर, जिल्हा नेते गोविंद पाटील, जिल्हाध्यक्ष एस के पाटील, जिल्हा सरचिटणीस शंकरराव पवार, विद्या कदम, अलका थोरात, प्रमिला माने, दिलीप भोई, पी आर पाटील, रंगराव वाडकर, सुनिल पोवार, अशोक शिवणे, दिगंबर टिपुगडे, अशोक खाडे, के एस पाटील, भारती चोपडे, प्रेरणा चौगुले, राजश्री पिंगळे, मनिषा गुरव आदींच्या सह्या आहेत.