नवी दिल्ली : आपलं शरीर तंदुरुस्त राखण्यासाठी पहाटेच्या सुमारास सूर्य नमस्कार घातला जातो. आता हाच सूर्य नमस्कार वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. त्याचं कारण म्हणजे मुस्लीम पर्सनल लॉ बोर्डानं यासंदर्भात एक फतवा काढला आहे.
सूर्य नमस्कार हा सूर्याच्या पूजेचा प्रकार असून इस्लाममध्ये याला परवानगी नाही, त्यामुळं विद्यार्थ्यांनी शाळेत आयोजित सूर्य नमस्काराच्या कार्यक्रमांना उपस्थित राहू नयेत, असं पत्रक बोर्डानं काढलं आहेमुस्लीम पर्सनल लॉ बोर्डानं काढलेल्या पत्रकात बोर्डाचे सरचिटणीस हजरत मौलाना खालिद सैफुल्लाह रहमानी यांनी म्हटलं की, भारत एक धर्मनिरपेक्ष, बहुधार्मिक आणि बहुसांस्कृतीक देश आहे. याच सिद्धांताच्या आधारावर आपलं संविधान लिहिण्यात आलं आहे.
शाळांचे अभ्यासक्रम आणि शैक्षणिक चर्चांमध्ये देखील याचं भान ठेवण्याचे निर्देश दिले आहेत. संविधान आपल्याला याची परवानगी देत नाही की, सरकारी शिक्षण संस्थांमध्ये कोणत्याही धर्माची शिकवण दिली जावी किंवा विशेष समूहाच्या मान्यतेच्या आधारे समारंभांच आयोजन केलं जावं हे अत्यंत दुर्देवी आहे. कारण सध्या सरकार संविधानाच्या या नियमापासून दूर चालली आहे. तसेच देशातील सर्व वर्गातील बहुसंख्याकांचा धार्मिक विचार आणि परंपरा थोपण्याचा प्रयत्न सुरु आहे.