कोल्हापूर (प्रतिनिधी): कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ (गोकुळ) च्या महालक्ष्मी पशुखाद्यास भारत सरकारने फूड सेफ्टी ॲक्ट (FSSAI) नुसार उत्पादन व विक्रीसाठी ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्डस् बीआयएस प्रमाणपत्र दिले. या मानांकन स्टँडर्डप्रमाने पशुखाद्याचे उत्पादन करून जिल्ह्यातील दूध उत्पादकांना अधिक गुणवत्तापूर्ण पशुखाद्य उपलब्ध करून देणार असल्याचे चेअरमन विश्वास पाटील यांनी यानिमित्ताने सांगितले.
संघाच्या गडमुडशिंगी व कागल पंचतारांकित एमआयडीसी या दोन ठिकाणी महालक्ष्मी पशुखाद्य उत्पादित केले जाते. गोकुळने अग्रक्रमाने बीआयएस मानांकन प्रमाणपत्रासाठी केंद्र सरकारकडे पाठपुरावा करून ते प्रमाणपत्र प्राप्त करून घेतले आहे. दर्जेदार गुणवत्तेचे पशुखाद्य गोकुळच्या दूध उत्पादकांच्या गाय व म्हशीसाठी उपलब्ध केले जाईल. याचा दूध वाढीसाठी नक्कीच याचा फायदा होणार आहे. मागील वर्षभरात १३ हजार मेट्रिक टन पशुखाद्य विक्री झाली आहे. लाखो दूध उत्पादकांचा संघाच्या महालक्ष्मी पशुखाद्यवरील विश्वास पुन्हा एकदा दृढ़ झाल्याचे पाटील म्हणाले..