कोल्हापूर : आठ महिन्यांत कोल्हापूर परिमंडळातील वीज ग्राहकांनी ३१९ कोटी रुपयांच्या बिलांचा ऑनलाईन भरणा केला. राज्यातील ७६ टक्के बिलांचा भरणा ऑनलाईन झाला असून, ऑनलाईनद्वारे ३५ हजार ४५३ कोटी रुपयांचा महसूल जमा झाला आहे.
डिजिटल सेवा उपलब्ध झाल्याने ग्राहकांनी कॅशलेस बिल भरण्यासाठी चांगला प्रतिसाद आहे. उच्चदाब वीज ग्राहकांसाठी दरमहा वीजबिल आरटीजीएस किंवा एनईएफटीद्वारे भरण्याची सोय असून, ते अनिवार्य आहे. त्यामुळे महावितरणच्या २० हजार ८७४ उच्चदाब वीज ग्राहकांकडून दरमहा सुमारे तीन हजार कोटी रुपयांचा भरणा त्याद्वारे होत आहे. एप्रिल ते नोव्हेंबर या आठ महिन्यांच्या कालावधीत एक लाख ६२ हजार ३४१ उच्चदाब ग्राहकांनी २२ हजार ६६४ कोटी रुपयांचा भरणा ऑनलाइनद्वारे केला. त्यामुळे धनादेश बाउन्स होणे, तो वटण्यास उशीर होणे किंवा अन्य अडथळे पूर्ण दूर झाले आहेत.