समरजित घाटगे यांनी घेतली मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांची भेट

कागल (प्रतिनिधी) : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची शाहू ग्रुपचे अध्यक्ष आणि भाजपचे जिल्हाध्यक्ष समरजित घाटगे यांनी भेट घेऊन आभार मानले. शिंदे-फडवणीस सरकार सत्तेवर येताच राज्यातील प्रामाणिकपणे…

आमच्याच आघाडीचा विजय ही काळ्या दगडावरची रेघ-डॉ.प्रकाश शहापूरकर

गडहिंग्लज (प्रतिनिधी) : संपूर्ण कार्यक्षेत्रातील सभासद शेतकऱ्यांशी संवाद साधला. शेतकऱ्यांचा प्रतिसाद पाहता ८० टक्क्यांहून अधिक मतदान छत्रपती शाहू शेतकरी समविचारी आघाडीला होईल. त्यामुळे,आमच्याच आघाडीचा विजय ही काळ्या दगडावरची रेघ आहे,…

कारखाना निवडणुकीत शाहू समविचारी शेतकरी आघाडीला वाढता पाठिंबा

गडहिंग्लज (प्रतिनिधी) : गोडसाखरच्या निवडणुकीत गडहिंग्लज तालुक्यातील सरपंचांनी छत्रपती शाहू शेतकरी समिविचारी आघाडीला पाठिंबा जाहीर केला. सरपंचानी आमदार हसनस मुश्रीफ यांची भेट घेत हा पाठिंबा जाहीर केला. यावेळी सरपंच संजय…

गुजरात विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजलं !

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : गुजरात विधानसभा निवडणूक दोन टप्प्यात होणार असून पहिल्या टप्प्यातील मतदान १ डिसेंबरला, तर दुसऱ्या टप्प्यातील मतदान ५ डिसेंबरला होणार आहे अशी माहिती केंद्रीय निवडणूक आयोगाने आज…

अर्जुन आबिटकर यांच्या हस्ते विविध विकास कामांचा शुभारंभ

पिंपळगाव (प्रतिनिधी) : पिंपळगाव जिल्हा परिषद मतदार संघाच्या मतदारांनी मला  दोन वेळा या मतदार संघाचे प्रतिनिधीत्व करण्याची संधी दिली. मतदारांच्या विश्वासाला पात्र राहून कार्यरत राहिलो आहे. जनहिताची कामे करताना गट-तटाचा…

तर मग कोल्हापुरात आणि महाराष्ट्रात तांडव होईल-आ.नितेश राणे

कोल्हापूर (प्रतिनिधी) : गेल्या काही दिवसांपासून राज्यासह कोल्हापुरातील लव्ह जिहाद आणि धर्मांतर प्रकरण समोर येत आहेत. या प्रकरणी गुन्हा दाखल होत असून देखील पोलीस तपास करत नाहीत. या घटनेला १५…

समरजित घाटगे यांच्या समर्थकांकडूनचं निराधारांची लूट-प्रताप उर्फ भैय्या माने

कागल (प्रतिनिधी) : समरजित घाटगे यांच्या समर्थकांकडूनच निराधार योजनेतील वृद्ध लाभार्थ्यांची आर्थिक लूट केली जात आहे असा पलटवार केडीसीसी बँकेची संचालक प्रताप उर्फ भैया माने यांनी केला आहे. कागलमध्ये झालेल्या…

खा.धनंजय महाडिकांची ठाकरे पितापुत्रांवर टीका  

कोल्हापूर (प्रतिनिधी) : अडीच वर्षांच्या महाविकास आघाडी सरकारच्या काळात सर्वच आघाड्यांवर आलेले अपयश लपविण्यासाठी आकांडतांडव करून त्याचे खापर शिंदेफडणवीस सरकारवर फोडण्याचा ठाकरे पितापुत्रांचा प्रयत्न हा महाराष्ट्रातील गुंतवणूक रोखण्याचा आणि नव्या गुंतवणूकदारांमध्ये महाराष्ट्राविषयी संभ्रम निर्माण करण्याचा पद्धतशीर प्रयत्न आहे, असा आरोप भाजपचे खासदार धनंजय  महाडिक  यांनी केला आहे. वेदान्त फॉक्सकॉन प्रकल्प महाराष्ट्राबाहेर गेल्याचे ठाकरे सरकारचे अपयश उघडकीस येऊ नये, यासाठी उलटा कांगावा करण्याचा प्रयत्न पुरता फसल्यानंतर आता महाराष्ट्राशी कोणताच संबंध नसलेल्या उद्योगांची खोटी यादी पुढे करून  जनतेच्यामनात संशय निर्माण करण्याचे उद्योग ठाकरे पितापुत्रांनी सुरू केले आहेत. प्रत्यक्षात ज्या उद्योगांशी महाविकासआघाडी सरकारच्या काळात ठाकरे यांनी साधी चर्चादेखील केली नव्हती, सामंजस्य करारही झाला नव्हता, किंवा सरकारमार्फत कोणताही पत्रव्यवहारदेखील झाला नव्हता, अशा उद्योगांची खोटी यादी पुढे करून एक अपप्रचाराचे टुलकिट तयार करण्याचा या पितापुत्रांचा प्रयत्न महाराष्ट्राच्या भविष्यातील प्रगतीस आणि उद्योगस्नेही वातावरणास अडसर निर्माण करणाराच आहे असा गंभीर आरोपही खासदार महाडिक यांनी केला.  अविश्वासाने आणि जनादेश लाथाडून अभद्र आघाडीद्वारे गैरमार्गाने मिळविलेली सत्ता अडीच वर्षांत गमावल्याच्या संतापातून ठाकरे पितापुत्रांचा हा थयथयाट सुरू असून, याचा सूड महाराष्ट्रावर उगवण्यासाठी राज्यातील गुंतवणुकीत अडसर  उभे करण्याचा भयंकर कट रचला जात आहे, असा संशय त्यांनी व्यक्त केला. महाराष्ट्राची जनता सुज्ञ आहे. कोविड काळात ठाकरे सरकारच्या भ्रष्ट कारभाराचे अनेक नमुने जनतेनेप्रत्यक्ष अनुभवले आहेत. जुलमी, एककल्ली, हेकेखोर, आणि कायदा गुंडाळून ठेवत जनतेला वार्‍यावर सोडणार्‍या आघाडी सरकारने अडीच वर्षांच्या सत्ताकाळात महाराष्ट्राला दहा वर्षे मागे नेऊन कॉंग्रेसी राजवटीत नेले. मात्र, आता अशा  कटकारस्थानांना केराची टोपली दाखवून राज्याला वेठीस धरणाऱ्यांना  जनता त्यांची जागा दाखवून देईल, असा इशाराही त्यांनी दिला.  ठाकरे सरकारशीसंबंधित असलेल्यांच्या भ्रष्टाचाराचे भयंकर नमुने आता उजेडात येऊ लागले आहेत. भ्रष्टाचाराच्या आणि देशद्रोह्यांना साह्य केल्याच्या आरोपाखाली तुरुंगाची हवा खावी लागलेल्या नेत्यांच्या पावलावर पाऊल टाकून आणखी काही बोलभांड नेत्यांना गजाआड जाण्याच्या भीतीने घाम फुटला असून त्या भीतीपोटीच हे आकांडतांडव सुरू आहे, असा टोलाही त्यांनी लगावला.

युवराज पाटील यांची समरजित घाटगे यांच्यावर टीका

कागल (प्रतिनिधी) : समरजित घाटगे प्रत्येक गोष्टीसाठी शाहू ग्रुपच्या कर्मचाऱ्यांना वेठीस धरीत आहेत. त्यांची डिजिटल बोर्ड ही योजना कर्मचाऱ्यांच्या सक्तीच्या वर्गणीतूनच उभारली जात आहे,असा आरोप गोकुळ दूध संघाचे ज्येष्ठ संचालक…

राजर्षी शाहू भास्करराव जाधव पॅनलचा प्रचार शुभारंभ

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर अर्बन बँकेच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी राजर्षी शाहू भास्करराव जाधव संस्थापक पॅनलच्या प्रचाराचा शुभारंभ आज (मंगळवारी) करण्यात आला. या प्रचार शुभारंभावेळी मनोगत भाषणात बोलताना जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष…

🤙 8080365706