शिवाजी विद्यापीठाचा भारतीय वायू दलासमवेत महत्त्वपूर्ण सामंजस्य करार

कोल्हापूर: भारतीय वायू दलाच्या (इंडियन एअर फोर्स) जवानांना सेवेवर कार्यरत असतानाही आपले उच्च शिक्षण पूर्ण करण्याची संधी शिवाजी विद्यापीठासमवेत झालेल्या सामंजस्य कराराद्वारे प्राप्त होणार आहे, ही अतिशय मौलिक बाब असल्याचे…

एमबीएच्या विद्यार्थ्यांच्या विपणन सहकार्यामुळे ‘चेतना’च्या उत्पादनांची ४ दिवसांत ४२ हजारांची विक्री

कोल्हापूर: समाजातील सक्षम नागरिकांनी अक्षम नागरिकांना सहकार्याचा हात पुढे केला, तर सामाजिक-आर्थिक विषमता दूर होण्याबरोबरच सामाजिक सौहार्द प्रस्थापित होण्यासही मदत होते, याचे बोलके उदाहरण शिवाजी विद्यापीठाच्या एमबीए अधिविभागाच्या विद्यार्थ्यांनी दाखवून दिले आहे.…

इंडियन कॉमर्स असोसिएशनकडून डॉ. श्रीकृष्ण महाजन यांचा फेलो म्हणून सन्मान

कोल्हापूर: शिवाजी विद्यापीठाच्या वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखेचे अधिष्ठाता प्रा. डॉ. श्रीकृष्ण महाजन यांना त्यांच्या वाणिज्य व व्यवस्थापन क्षेत्रातील योगदानाबद्दल इंडियन कॉमर्स असोसिएशनने फेलो म्हणून सन्मानित केले आहे. उदयपूर येथे नुकत्याच पार पडलेल्या ७५ व्या अखिल भारतीय वाणिज्य परिषदेत गुरू गोविंद जनजातीय विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. व्ही. के. माथूर यांच्या हस्ते प्रा. महाजन यांचा सन्मान करण्यात आला. त्यांनी उच्च शिक्षण क्षेत्रात वाणिज्य व व्यवस्थापन विषयामध्ये केलेले अध्ययन, अध्यापन, संशोधन व विस्तारकार्य याबद्दल त्यांना गौरविण्यात आले आहे.     प्रा. महाजन यांनी अकौंटन्सी व फायनान्स या विषयांचे अध्यापन केले आहे. अकौंटन्सी, फायनान्स, उद्योजकता विकास, काजू प्रक्रिया व अन्न प्रक्रिया उद्योग, ग्रामीण व्यवस्थापन या विषयांवर संशोधन केले आहे. विद्यापीठ अनुदान आयोग, भारतीय सामाजिक विज्ञान अनुसंधान परिषद तसेच शिक्षण मंत्रालयाच्या इम्प्रेस या योजनेचे अनुदान त्यांच्या संशोधन प्रकल्पांना प्राप्त झाले. उद्योजकता विकास व वित्तीय समावेशन या विषयावर हे संशोधन प्रकल्प त्यांनी पूर्ण केले आहेत. २० विद्यार्थ्यांनी त्यांच्या मार्गदर्शनाखाली पीएच. डी.चे संशोधन पूर्ण केले आहे. राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२० च्या अंमलबजावणीमुळे उच्च शिक्षण क्षेत्रात होणाऱ्या बदलांच्या संदर्भात त्यांनी महाराष्ट्रभर अनेक व्याख्याने दिली आहेत. त्या अनुषंगाने विद्यापीठीय धोरण निर्मितीमध्येही त्यांचा महत्त्वाचा वाटा राहिला आहे. अकौंटन्सी अभ्यास मंडळाचे अध्यक्ष असताना त्यांनी अभ्यासक्रमात प्रात्यक्षिकांचा समावेश करण्यासाठी आग्रहपूर्वक प्रयत्न केले. कुलगुरू व प्र-कुलगुरु यांच्या मार्गदर्शनाखाली एम. बी. ए. ऑनलाइन, बी. कॉम. (बी.एफ.एस.आय.) व बी. बी. ए. – एम. बी. ए. (इंटिग्रेटेड) असे नवीन अभ्यासक्रम सुरू करण्यामध्ये त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे.

दीपक अथणे यांना रोटरी क्लब ऑफ इचलकरंजीचा नेशन बिल्डर-आदर्श शिक्षक पुरस्कार

 प्रतिनिधी (विनोद शिंगे) वीर सेवा दल जिल्हा मध्यवर्ती सदस्य, आंतरभारती विद्यालय इचलकरंजी येथील संस्कृत विभाग प्रमुख, शालेय पोषण आहार प्रमुख दीपक अथणे यांना शिवाजी विद्यापीठ, कोल्हापुरचे प्र.कुलगुरु प्रा. डॉ. पी.…

दहावीच्या परीक्षेत आता ३५ नाही तर २० मार्क मिळाले तरी होणार पास

पुणे : महाराष्ट्र बोर्डाने इयत्ता दहावीच्या परीक्षेत बदल केल्याची माहिती समोर आली आहे. विद्यार्थ्यांना यापुढे गणित आणि विज्ञान या विषयांमध्ये ३५ ऐवजी २० किंवा त्यापेक्षा जास्त गुण मिळाले तरी त्यांना…

अनुराधा पाटील, वीरधवल परब यांना काळसेकर पुरस्कार प्रदान

कोल्हापूर : कवितेच्या माध्यमातून परतत्त्वाचे संरक्षण आणि संवेदनांचे संवर्धन करण्याचा आजचा कालखंड असून त्याद्वारे समाजाची सर्वंकष समज वाढविण्याचा कवी-साहित्यिकांनी प्रयत्न करणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे…

लोकशाही टिकण्यासाठी माध्यमांची विश्वासार्हता जपणे आवश्यक : डॉ. अभिजीत कांबळे

कोल्हापूर : लोकशाही टिकण्यासाठी माध्यमांची विश्वासार्हता टिकविणे आवश्यक आहे. माध्यम क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या युवा पिढीने ही जबाबदारी पेलण्यासाठी स्वतःला तयार केले पाहिजे, असे प्रतिपादन ज्येष्ठ पत्रकार तथा बीबीसीचे संपादक…

घोडावत विद्यापीठात एम फार्म कोर्स सुरू ,फार्मसी कौन्सिलचे विजय पाटील यांच्याहस्ते उद्घाटन

अतिग्रे : फार्मसी कौन्सिल ऑफ इंडियाने एम.फार्म कोर्स -फार्मास्युटिक्स आणि फार्मास्युटिकल क्वालिटी ॲश्युरन्स असे दोन कोर्स सुरू करण्यास मान्यता दिली होती.या कोर्सचे उद्घाटन कौन्सिलचे सदस्य विजय पाटील यांच्या हस्ते झाले.…

शिवाजी विद्यापीठात जनमानसातील अन्नाविषयीचे संभ्रम दूर करणारे प्रदर्शन

कोल्हापूर: मनुष्य आपल्या राहणीमानाविषयी तसेच खानपान सवयींविषयी अधिक जागरूक झाला आहे. त्याच्यावर विविध माध्यमांतून चांगल्या आरोग्यासाठी हे करा, ते करू नका; हे खा, ते खाऊ नका अशा प्रकारच्या संदेशांचा भडिमार…

वाचनामुळेच माणूस अधिक प्रगल्भ: नंदकुमार मोरे

कोल्हापूर: वाचनामुळेच माणूस अधिकाधिक प्रगल्भ बनतो, असे प्रतिपादन मराठी विभागप्रमुख डॉ. नंदकुमार मोरे यांनी केले. शिवाजी विद्यापीठाचा मराठी अधिविभाग आणि महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, मंबई यांच्या संयुक्त विद्यमाने…

🤙 8080365706