कागल:कागल, गडहिंग्लज व उत्तुर विधानसभा मतदारसंघातील ब वर्ग तीर्थस्थळे व रस्त्यांच्या कामांसाठी तब्बल रू. ९१ कोटी निधी मंजूर झाला आहे. याकामी योगदानाबद्दल मुख्यमंत्री नामदार देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री नामदार एकनाथरावजी शिंदे, उपमुख्यमंत्री नामदार श्रीमती सुनेत्रावहिनी पवार यांचे योगदान लाभल्याची माहिती मंत्री श्री. मुश्रीफ दिलेली आहे.

विविध योजना अंतर्गत मंजूर झालेला निधी असा…..
■ मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत रू. ५५ कोटी मंजूर…….
□ नानीबाई चिखली – निपाणी रस्ता: २ कि. मी.
□ सुळकुड – कोगनोळी रस्ता: ७.८ कि. मी.
□ बोरवडे रस्ता: २ कि. मी.
□ व्हनाळी – साके रस्ता: १.३ कि. मी.
□ उंदरवाडी रस्ता: १.७ कि. मी.
□ मेतके – हमीदवाडा रस्ता: २.५ कि. मी.
□ कौलगे रस्ता: २. २ कि. मी.
□ जख्खेवाडी रस्ता: १.१ कि. मी.
□ उत्तूर – होन्याळी रस्ता: ४.४ कि. मी.
■ अर्थसंकल्प मार्च -२०२६ रस्त्यांसाठी रू. ३१ कोटी निधी मंजूर ……
□ येवती पाटी, बाचणी, साके, सावर्डे बुद्रुक, चौंडाळ रस्ता: रु. ४.५ कोटी
□ बिद्री, वाळवे, बाचणी, व्हनाळी, शेंडूर, वंदूर, करनूर रस्ता: रु. ५ कोटी
□ हसूर बुद्रुक, बोळावी, ठाणेवाडी, अवचितवाडी, चिमगाव, मुरगूड रस्ता: रु. १० कोटी
□ लिंगनूर, सेनापती कापशी, तमनाकवाडा, माद्याळ, बहिरेवाडी, वडरगे, गडहिंग्लज रस्ता: रु. २.५ कोटी
□ बारडवाडी, तळाशी, चंद्रे, कसबा वाळवे, पिराचीवाडी, सावर्डे बुद्रुक रस्ता: रु. २ कोटी
□ मडिलगे फाटा, उत्तूर, बहिरेवाडी रस्ता: रु. १ कोटी
□ बिद्री, वाळवे, बेलवळे, बाचणी रस्ता: रू. ६ कोटी
■ ‘ब’ वर्ग तीर्थस्थळांसाठी रू. १० कोटी निधी मंजूर
□ श्री बाळूमामा – सत्यव्वा देवी मंदिर मूळक्षेत्र, मेतके ता. कागल: २ कोटी
□ श्री अंबाबाई मंदिर, यमगे, ता. कागल: २ कोटी, एक लाख
□ श्री हनुमान मंदिर, भडगांव ता. कागल: २ कोटी १० लाख
□ हजरत लाडले मशाकात दर्गा, कसबा सांगाव ता. कागल: २ कोटी, एक लाख
□ श्री गहिनीनाथ देवालय, पिराचीवाडी ता. कागल: ७५ लाख
□ श्री सिद्धेश्वर देवालय, सिद्धनेर्ली ता. कागल: १ कोटी १८ लाख
■ ‘ब’ वर्ग तीर्थस्थळांमध्ये नव्याने समाविष्ट झालेली मंदिरे…….
□ श्री केदारलिंग मंदिर, गिजवणे ता. गडहिंग्लज
□ श्री नारायण मंदिर, करंबळी ता. गडहिंग्लज
□ श्री रामलिंग मंदिर, शिप्पूर ता. गडहिंग्लज
