कागलचे सुपुत्र व सुप्रसिद्ध चार्टर्ड अकाउंटंट महेश गुरव यांचे निधन          मंत्री हसन मुश्रीफ यांनी वाहिली भावपूर्ण श्रद्धांजली

कोल्हापूर:कागलचे सुपुत्र व सुप्रसिद्ध चार्टर्ड अकौटंट श्री. महेश गुरव यांचे ‘ब्रेन स्ट्रोक’ या मेंदूच्या आजारामुळे दुर्दैवी आणि अकाली निधन झाले. कोल्हापुरातील खाजगी दवाखान्यात उपचार सुरू असतानाच काल सोमवार दि. २१ रोजी रात्री उशिरा त्यांची प्राणज्योत मालवली. आज मंगळवार दि. २२ रोजी सकाळी १०. ०० वाजता कागलमधील स्मशानभूमीमध्ये त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणार आहेत. 

 

 

 

त्यांच्या पार्थिवाला भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करताना मंत्री श्री. मुश्रीफ म्हणाले, तरुण आणि उमदे व्यक्तिमत्त्व असलेले श्री. महेश गुरव हे माझे अत्यंत जवळचे व विश्वासू सहकारी होते. अभ्यासु वृत्ती आणि कठोर परिश्रमाच्या जोरावर त्यांनी यशोशिखर गाठले होते. माझे व्यक्तिगत तसेच कारखान्याचे लेखापरीक्षण आणि अनेक लेखापरीक्षणाच्या जबाबदाऱ्या त्यांच्यावर सोपवलेल्या होत्या. त्या त्यांनी तितक्याच समर्थपणे पारही पाडलेल्या होत्या. त्यांच्या जाण्याने वैयक्तिक माझी आणि माझ्या कुटुंबाची फार मोठी हानी झालेली आहे. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो…….!

 

कुशाग्र बुद्धिमत्ता आणि अफाट जिद्दीच्या जोरावर पश्चिम महाराष्ट्रातील एक प्रसिद्ध सनदी लेखापाल (चार्टर्ड अकाउंटंट) म्हणून ते प्रसिद्धीला आले होते. त्यांनी कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, गोकुळ दूध संघ यांसारख्या मोठ्या सहकारी संस्था, अनेक खाजगी साखर कारखाने, महापालिकेचा एलबीटी विभाग तसेच; जीएसटी विभाग इत्यादी शासकीय आस्थापनांचेसुद्धा लेखापरीक्षण त्यांनी केले होते. त्यांच्यावर गेले तीन आठवडाभर उपचार सुरू होते. परंतु; उपचारांना प्रतिसाद मिळत नव्हता.

🤙 8080365706