शिक्षण महर्षी पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील यांच्या निधनावर खासदार धनंजय महाडिक यांची श्रद्धांजली “महाराष्ट्राच्या सामाजिक, शैक्षणिक जीवनातील उत्तुंग व्यक्तिमत्त्व हरपले : खा. धनंजय महाडिक

कोल्हापूर : शिक्षण महर्षी पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील* यांच्या निधनाची बातमी अत्यंत दुःखद आहे, अशी प्रतिक्रिया राज्यसभा खासदार धनंजय महाडिक यांनी व्यक्त केली आहे.

 

 

खासदार महाडिक म्हणाले, “सात विद्यापीठांच्या माध्यमातून ज्यांनी लाखो विद्यार्थ्यांचे करिअर घडवले, खऱ्या अर्थाने शिक्षणाचा प्रचार प्रसार केला असे डॉ. डी. वाय. पाटील माझ्यासाठी आदरणीय आणि पितृतुल्य व्यक्तिमत्त्व होते. आरोग्य क्षेत्रातही त्यांनी भरीव काम केले.”

ते पुढे म्हणाले, “आमदार म्हणून त्यांनी काही काळ राजकारणात सक्रिय भूमिका बजावली. तर तीन राज्यांचे राज्यपाल म्हणून त्यांनी तत्त्वनिष्ठ आणि कर्तव्यनिष्ठ काम पाहिले. महाराष्ट्राच्या सामाजिक, शैक्षणिक आणि राजकीय जीवनातील एक उत्तुंग व्यक्तिमत्त्व म्हणून त्यांचे नाव अजरामर राहील. अशा या थोर व्यक्तिमत्त्वाच्या निधनामुळे फक्त कोल्हापूरचे नव्हे तर महाराष्ट्राचे अतिव नुकसान झाले आहे.”

खासदार महाडिक यांनी डॉ. डी. वाय. पाटील यांना भावपूर्ण आदरांजली अर्पण केली.

🤙 8080365706