रंगकर्मी यांच्यावर अन्याय होणार नाही; आ .राजेश क्षीरसागर यांची ग्वाही

कोल्हापूर : पूर्णत्वाच्या मार्गावर असलेल्या केशवराव भोसले नाट्यगृहाचे व्यवस्थापन महापालिकेने खासगी संस्थेकडे देण्याचा ठराव पास केला होता. यामुळे रंगकर्मीयांच्या भावना तीव्र झाल्या होत्या आणि अनेक समज-गैरसमज निर्माण झाले होते. या पार्श्वभूमीवर महानगरपालिका प्रशासन आणि रंगकर्मी यांच्यात  बैठक घेण्यात आली.

 

 

या बैठकीला आमदार राजेश क्षीरसागर उपस्थित होते. दोन्ही बाजूंची भूमिका ऐकून घेतल्यानंतर त्यांनी महानगरपालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भारूड आणि महापौर रूपाराणी निकम यांना रंगकर्मीयांच्या भावना लक्षात घेऊन या विषयावर महासभेत पुन्हा एकदा चर्चा करूनच निर्णय घ्यावा, अशा सूचना केल्या.

 

शहराचा लोकप्रतिनिधी या नात्याने रंगकर्मींवर अन्याय होणार नाही, त्यांच्यावर कोणताही आर्थिक बोजा पडणार नाही आणि कलेचे कोणतेही नुकसान होणार नाही, यासाठी मी सतर्क आहे, अशी ग्वाही आमदार राजेश क्षीरसागर यांनी दिली. तसेच कोणताही निर्णय घेताना त्या-त्या विषयातील तज्ञांसोबत सल्लामसलत करूनच तो घ्यावा, असेही त्यांनी सांगितले.

 

केशवराव भोसले नाट्यगृहाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. डीपी बसविण्याच्या कामासाठी आपल्या निधीतून 1.80 कोटी रुपयांचा निधी तातडीने दिला असल्याचेही ते म्हणाले. लवकरात लवकर हे काम पूर्ण करून 9 ऑगस्ट रोजी मुख्यमंत्री यांच्या दौऱ्यात केशवराव भोसले नाट्यगृह, रंकाळा फॉउंटन, छत्रपती शाहू महाराज समाधी स्थळ आणि पूर नियंत्रण प्रकल्प यांचे उद्घाटन करण्याचा प्रयत्न आहे, अशी माहिती त्यांनी पत्रकार बैठकीत दिली.

 

या बैठकीला आयुक्त डॉ. राजेंद्र भारूड, महापौर  रूपाराणी निकम, अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ, रंगकर्मी, शिवसेना पदाधिकारी आणि महानगरपालिका प्रशासनातील अधिकारी उपस्थित होते.

 

🤙 8080365706