तळसंदे :
महाराष्ट्र कृषी शिक्षण आणि संशोधन परिषद, पुणे यांच्यामार्फत घेण्यात आलेल्या पदव्युत्तर पदवी सामयिक प्रवेश पात्रता परीक्षेत

तळसंदे येथील डॉ. डी. वाय. पाटील कृषी अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालय (बी. टेक ॲग्री.) आणि डॉ. डी. वाय. पाटील कृषी महाविद्यालय (बी. एस्सी ॲग्री.) च्या विद्यार्थ्यांनी राज्यात अव्वल स्थान मिळवले आहे. संस्थेचे विश्वस्त ऋतुराज पाटील यांच्या हस्ते या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.
या परीक्षेत बी. टेक ॲग्रीच्या दीपक समाधान शिंदे याने राज्यात प्रथम क्रमांक मिळवला. तर दिक्षा मगदूम (५), युवराज परीट (११), प्रणव पाटील (१५), कुणाल ठावरे (१६), वरुण पाटील (१७), विशाल चव्हाण (३०), अभिषेक भुसाळ (३३), सोहम मांडे (३६) आणि संतोष हुलवान (३६) यांनीही राज्य गुणवत्ता यादीत स्थान मिळवले.
बी. एस्सी ॲग्री. ची विद्यार्थीनी कु. प्रज्ञा मानसिंग भोसले हिनेही महाराष्ट्रात प्रथम क्रमांक प्राप्त केला आहे. याशिवाय अमेय बारटक्के (३), श्रद्धा पाटील (८), ऋतुजा मोरे (१४), जयदत्त पठाडे (१६) आणि धीरज पाटील (१८) यांनी राज्य गुणवत्ता यादीत स्थान मिळवले आहे. या यादीत पहिल्या ५० गुणवंत विद्यार्थ्यांमध्ये महाविद्यालयाच्या एकूण २० विद्यार्थ्यांनी स्थान मिळवले आहे.
विश्वस्त ऋतुराज पाटील म्हणाले, विद्यार्थ्यांनी मिळवलेले हे यश संपूर्ण संस्थेसाठी अभिमानास्पद आहे. गुणवत्तापूर्ण शिक्षण, आधुनिक तंत्रज्ञान आणि सातत्यपूर्ण मार्गदर्शन यामुळे ही यश मिळाले आहे. विद्यार्थ्यांना राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर सक्षम करण्यासाठी आवश्यक सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यात येतील.
कार्यकारी संचालक डॉ. ए. के. गुप्ता म्हणाले, दोन्ही
महाविद्यालयांनी राबविलेली नियमित मार्गदर्शन सत्रे, तज्ज्ञ प्राध्यापकांचे वैयक्तिक मार्गदर्शन, स्पर्धा परीक्षा सराव चाचण्या याचा चांगला फायदा विद्यार्थ्यांना झाला. आगामी काळातही स्पर्धा परीक्षा आणि संशोधनाभिमुख शिक्षणासाठी अधिक सक्षम वातावरण निर्माण करण्यात येईल.
बी. टेक ॲग्री.चे प्राचार्य डॉ. एस. बी. पाटील आणि बी. एस्सी. ॲग्री.चे प्राचार्य डी. एन. शेलार यांनीही विद्यार्थ्यांचे कौतुक करत अभिनंदन केले. भविष्यातही ही यशाची परंपरा कायम ठेवण्यासाठी प्रयत्नशील राहू अशी ग्वाही त्यांनी दिली.
यावेळी उपप्राचार्य पी.डी. उके, प्रा. अमोल गाताडे, प्रा. आर. आर. पाटील यांच्यासह विभागप्रमुख, प्राध्यापक व विद्यार्थी उपस्थित होते.
संस्थेचे अध्यक्ष डॉ संजय डी पाटील, उपाध्यक्ष आमदार सतेज डी पाटील, विश्वस्त पृथ्वीराज पाटील यांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.
