पाणी भरताना विजेचा शॉक लागून 39 वर्षीय महिलेचा मृत्यू

कोल्हापूर : रविवारी सकाळी पाण्याची टाकी भरत असताना इलेक्ट्रीक मोटरचा करंट लागून एका महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला.

 

महिलेचे नाव आशा अरुण देसाई वय 39 राहणार जय हिंद नगर, कबनूर असे आहे. ही घटना सकाळच्या वेळी घडली. या प्रकरणाची नोंद शिवाजीनगर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आशा देसाई सकाळी घरासमोरील हौदातील पाणी मोटारीच्या मदतीने गच्चीवरील टाकीत भरत होत्या. त्याच दरम्यान मोटारीतून विजेचा प्रवाह अंगावर आल्याने त्यांना जोरदार शॉक बसला. शॉक बसून त्या जागीच बेशुद्ध होऊन खाली पडल्या.

 

जवळच्या लोकांनी आणि नातेवाईकांनी त्यांना तातडीने खाजगी दवाखान्यात नेले. प्रकृती जास्त गंभीर असल्याने नंतर त्यांना पुढील उपचारासाठी इचलकरंजी येथील इंदिरा गांधी रुग्णालयात हलवण्यात आले.

 

 

🤙 8080365706